नांदेडमध्ये गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांवर सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले (फोटो - istock)
Nanded Crime News : किनवट : किनवट तालुक्यात मालाविरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत त्यांना सहा महिन्यांसाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अन्वये करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. (Crime News) हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये अजित बाबू बेले (वय ३२ वर्ष) व चंद्रकांत उर्फ चंदू बाबू बेले (वय २५ वर्ष, रा. गंगानगर, किनवट) यांचा समावेश आहे. (Nanded News)
या दोघांविरुद्ध किनवट पोलीस स्टेशन हद्दीत मालमत्तेविरुद्ध तसेच शरीराविरुद्धचे विविध गुन्हे नोंद आहेत. तसेच ते सार्वजनिक शांतता भंग करून परिसरात दहशत निर्माण करत असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या अपघाताला नवे वळण! घटनेपूर्वी बारामती विमान तळाची रेकी? आमदार रोहित पवार यांचा धक्कादायक दावा
पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव
सदर प्रस्ताव पोलीस निरीक्षक गणेश व्यंकटराव कराड यांनी सादर करून तो उपविभागीय पोलीस अधिकारी, किनवट यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ज.क्र. ५९८/२०२६ दिनांक ४ फेब्रुवारी रोजी आदेश पारित करत दोन्ही इसमांना ६ महिन्यांसाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली असून संबंधित इसमांना पोलीस अधीक्षकांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या कालावधीत जिल्ह्यात प्रवेश करता देणार नाही. ही कारवाई पोलिस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रामकृष्ण मळवणे उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट व श्रीमती अर्चना पाटील अप्पर पोलीस अधिकारी भोकर यांच्या सहकार्याने पार पडली.
गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहतील, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : विनोद तावडेंना मिळालं प्रामाणिक पणाचं गिफ्ट! राज्यसभेवर संधी मिळताच व्यक्त केल्या भावना
जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई
नांदेड परिक्षेत्रात वाढत चाललेल्या अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने नांदेड व परभणी जिल्ह्यात समन्वयित धडक कारवाई केली. मटका व जुगार अड्यांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये एकूण २५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.






