Middle East War : इराणचा 'रक्षक' आता अमेरिकेच्या रडारवर? सर्गियो यांची श्रीलंकेला भेट, हिंद महासागरात युद्ध पेटणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या आठवड्यात हिंद महासागरात इराण(Iran) च्या एका युद्धनौकेवर अमेरिकेने हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे प्रचंड नुकसान झाले होते. यानंतर भारताने आणि श्रीलंकेने इराणच्या नौसैनिकांना परत पाठण्यास मदत केली होती. तसेच आणखी दोन युद्धनौकांना आपल्या बंदरावर स्थान दिले होते. यावर अमेरिका-श्रीलंकेत मतभेद निर्माण झाले होते.
इराणच्या युद्धनौकेवर झालेल्या हल्ल्यानंतर श्रीलंकेने तातडीने बचावकार्य करत ३० इराणनी नौसैनिकांचे प्राण वाचवले होते. तसेच त्यांना सुखरुप त्यांच्या मायदेशी पोहोचवले होते. याशिवाय मृत सैनिकांचे मृतदेही इराणकडे सोपवले होते. मात्र अमेरिकेचा दबाव झुगारून इराणला मदत केल्याने श्रीलंका अडचणी आला आहे. अमेरिकेने यावर नाराजी व्यक्त केली आहे.
याशिवाय अमेरिकेने श्रीलंकेकडे क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली लढाऊ विमाने उतरवण्याची परवानगीही मागतली होती. परंतु श्रीलंका (Sri Lanka) सरकारने तटस्थ भूमिका घेत अमेरिकेला परवानगी देण्यास नकार दिला होता. या दोन्ही मुद्द्यांवरुन अमेरिका आणि श्रीलंकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान सर्गियो गोर यांच्या या भेटीने दक्षिण आशियाच्या समीकरणात मोठा बदल घडण्याची शक्यात आहे. सर्गियो श्रीलंकेनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावरही अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी भेट देणार आहे. यामुळे सर्गियो भारत-पाकिस्तानात मध्यस्थी करणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु भारताने पाकिस्तानशी वादात यापूर्वीही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला विरोध केला आहे. तज्ज्ञांच्या मते, हिंद महासागरात अमेरिका आपली उपस्थित पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या अमेरिकेच्या याहालचींवर भारतही बारकाईने लक्ष्य ठेवून आहे.
US Iran War : इराणचा मोठा दावा! अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली विमान F-35 पाडले? जाणून घ्या काय आहे सत्य
Ans: गेल्या आठवड्यात श्रीलंकेच्या इराणला मदतीने अमेरिका नाराज आहे, याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे विशेष दूत सर्गियो गोर श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले आहेत.
Ans: सर्गियो गोर यांची इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे. या दौऱ्यात ते पाकिस्तान, मालदीवलाही भेट देणार आहे. यामुळे भारतासाठी दक्षिण आशियातील समीकरणाच्या पार्श्वभूमीवर ही बाब धोक्याची मानली जात आहे.






