विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Vinesh Phogat become Mother: भारताची स्टार कुस्तीगीर आणि जुलाना विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार विनेश फोगटकडून आज (१ जुलै) आनंदाची बातमी समोर आली आहे. विनेशने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. ही आनंदाची बातमी येताच कुटुंब, राजकीय वर्तुळासह आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाची लाट पसरली. विनेश आणि तिचा मुलगा दोघेही निरोगी आहेत आणि या निमित्ताने कुटुंबासह हरियाणा काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आनंदाची बाब म्हणजे देशभरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि खासदार कुमारी शैलजा यांनी विनेश यांना त्यांच्या आयुष्यातील या नवीन अध्यायाबद्दल अभिनंदन केले आहे. कुमारी शैलजा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विनेश फोगाटला शुभेच्छा दिल्या आहेत. “जुलाना येथील काँग्रेस आमदार श्रीमती विनेश फोगट जी यांना मुलाच्या जन्माबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. मी देवाला प्रार्थना करते की नवजात बाळ कुटुंबात आनंद आणि मंगल घेऊन येवो आणि तुम्ही दोघेही निरोगी आणि आनंदी राहा.”अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय पक्षातीलनेत्यांकडून आणि समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे.
जुलाना से कांग्रेस विधायक श्रीमती @Phogat_Vinesh जी को पुत्र रत्न की प्राप्ति पर हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ।
ईश्वर से प्रार्थना है कि नवजात शिशु परिवार के लिए आनंद और शुभता लेकर आए तथा आप दोनों स्वस्थ एवं प्रसन्नचित्त रहें।
— Kumari Selja (@Kumari_Selja) July 1, 2025
विनेश फोगटने १३ डिसेंबर २०१८ रोजी कुस्तीगीर सोमवीर राठीशी लग्नगाठ बांधली होती. हा विवाह हरियाणातील चरखी दादरी येथे पारंपारिक विधींनी पार पडला. चरखी दादरी विनेशचे मूळ गाव देखील आहे. लग्नानंतरही विनेशने तिची कुस्ती कारकीर्द सुरू ठेवली आणि अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले.
‘Maalik’ चित्रपटाचा जबदस्त ट्रेलर प्रदर्शित, राजकुमार राव दिसला डॅशिंग अंदाज
पण गेल्या वर्षी केवळ १०० ग्रॅम जास्त वजनामुळे तिला २०२४ च्या ऑलिंपिक पात्रता फेरीत अंतिम टप्प्यातून बाहेर पडावे लागले. या अनुभवानंतर तिने कुस्तीला निरोप देण्याचा निर्णय घेतला आणि राजकारणात नशीब आजमावले. काँग्रेसमध्ये दाखल होत तिने २०२४ मध्ये जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झली. पण आता ती एका नवीन भूमिकेत, आई म्हणून, विनेश फोगटने तिच्या आयुष्यातील आणखी एक प्रेरणादायी अध्याय सुरू केला आहे.