Bengal election counting live updates Marathi (Credit AI)
West Bengal Election Results 2026 Live: पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची आज (04 मे) मतमोजणी होणार आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील, त्यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे.
पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा जागा आहेत, त्यापैकी केवळ २९३ जागांची मतमोजणी होणार आहे. मतदान दोन टप्प्यांत झाले. पहिला टप्पा २३ एप्रिल रोजी १५२ जागांसाठी, तर दुसरा टप्पा २९ एप्रिल रोजी १४२ जागांसाठी पार पडला. ममता बॅनर्जी येथे सलग चौथ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत, तर भाजप यावेळी सत्तेसाठी लढत आहे. या निवडणुकीत सुमारे ९२ टक्के मतदान झाले. लक्ष भवानीपूर मतदारसंघावर केंद्रित आहे, जिथे ममता बॅनर्जी स्वतः निवडणूक लढवत असून, त्यांना भाजपचे सुवेंदू अधिकारी आव्हान दिले आहे
04 May 2026 02:57 PM (IST)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सोमवारी २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने मतमोजणीचे अंदाज जाहीर करण्यास सुरुवात करताच, अनेक ठिकाणी मतमोजणी थांबवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आणि भारतीय निवडणूक आयोग व केंद्रीय दलांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप केला.
04 May 2026 01:47 PM (IST)
West Bengal Election Results 2026 Live: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच आसनसोलमधून हिंसेची मोठी घटना समोर आली आहे. आसनसोल अभियांत्रिकी महाविद्यालयाबाहेरील मतमोजणी केंद्रावर तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला. या राड्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना लाठीमार करावा लागला आहे.
04 May 2026 12:25 PM (IST)
West Bengal Election Results 2026 Live: पश्चिम बंगालमध्ये भाजपने १९८ जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, टीएमसी ९८ जागांसह १०० च्या खाली घसरली आहे. हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
04 May 2026 11:51 AM (IST)
आर. जी. कर बलात्कार पीडितेची आई पाणीहाटी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. त्या पाणीहाटी मतदारसंघात आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार आर. जी. कर ३,००० मतांनी आघाडीवर आहेत.
04 May 2026 11:11 AM (IST)
पश्चिम बंगालच्या भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी अजूनही पिछाडीवर आहेत. मतमोजणीच्या दोन फेऱ्यांनंतर, भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. ते १,५५८ मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या आणखी वीस फेऱ्या होणार आहेत.
04 May 2026 11:05 AM (IST)
पश्चिम बंगालमध्ये भाजप बहुमताच्या जवळ दिसून येत आहे. अवघ्या 12 जागा भाजप बहुमतापासून दूर असून हे सुरुवातीचे कल आहेत. टीएमसी 100 जागांच्या जवळ आघाडीवर दिसत आहे.
04 May 2026 11:05 AM (IST)
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी 124 जागांवर तर, भाजप 137 जागांवर आघाडीवर आहे. बहुतासाठी 147 जागांची आवश्यकता होती.
04 May 2026 11:05 AM (IST)
भवानीपूरमधून ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणूक लढणार सुवेंदू अधिकारी हे पिछाडीवर आहेत. मात्र, ममता आणि त्यांच्यातील मतांचे अंतर अवघे 1500 आहे.
04 May 2026 10:05 AM (IST)
अलीकडील ट्रेंडनुसार भाजप आघाडीवर असून, तृणमूल काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे आणि शर्यतीतून बाहेर पडल्यासारखी दिसणारी काँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे. यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन करेल का, हा प्रश्न निर्माण होतो.
04 May 2026 10:00 AM (IST)
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल समोर येत असताना राजकीय आरोप-प्रत्यारोपांना धार चढली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या एका ट्विटवर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
सामिक भट्टाचार्य म्हणाले की, "निवडणूक आता संपली असून निकाल समोर येत आहेत. यात चढ-उतार असणारच. आमचे कार्यकर्ते सर्वत्र सतर्क आणि जागे आहेत. आता दीदींनी (ममता बॅनर्जी) थोडी विश्रांती घ्यावी अशी आमची इच्छा आहे." यावेळी त्यांनी टीएमसीच्या आक्रमक भूमिकेवर निशाणा साधताना म्हटले की, कोणाच्या विरोधात अनावश्यक बोलणे किंवा वक्तव्ये करणे हे भाजपच्या संस्कृतीत बसत नाही. सुरुवातीच्या कलांनंतर बंगालच्या सत्तेत कोणाची वर्णी लागणार, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
04 May 2026 09:15 AM (IST)
पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीपासूनच अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. सत्ताधारी टीएमसी आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. २९३ पैकी २२१ जागांच्या ट्रेंडनुसार, भाजप ११० जागांवर आणि टीएमसी १०५ जागांवर आघाडीवर आहे.
04 May 2026 09:08 AM (IST)
पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांनुसार, टीएमसी ७५ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप ७१ जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत काँग्रेसही दोन जागांवर आघाडीवर आहे.
04 May 2026 09:06 AM (IST)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या भवानीपूर या मतदारसंघात पिछाडीवर आहेत. त्यांना भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्याकडून कडवी झुंज मिळत आहे.






