नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि बेंगळुरूसह प्रमुख शहरांमधील आकडेवारीत मंगळवार, 18 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) स्थिर होते. मात्र, देशभरातील शहरांमध्ये देशभरातील इंधनाच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 23 पैशांनी घसरले तर डिझेलचे दर 22 पैशांनी घसरून अनुक्रमे 102.63 रुपये आणि 94.24 रुपये प्रति लिटर झाले. गुरुग्राममध्ये पेट्रोलच्या दरात 44 पैशांनी वाढ होऊन ते 97.10 रुपयांवर पोहोचले, तर डिझेल 42 पैशांनी महागून 89.96 रुपये प्रति लिटर झाले. डेहराडून, मंगळुरू आणि भोपाळमध्ये त्यांच्या इंधनाच्या किमतीत वाढ झाली, तर कोईम्बतूर, इंदूर, नाशिक आणि पुण्यात त्यांच्या किमती घसरल्या.
[read_also content=”बीड की बिहार! शेतात जाण्याच्या वादातुन अवघ्या 15 वर्षाच्या मुलाची हत्या, मृतदेह टांगला झाडाला https://www.navarashtra.com/crime/a-15-year-old-boy-was-killed-over-dispute-about-going-to-the-farm-the-body-was-hanged-from-a-tree-nrps-387173.html”]
फायनान्शियल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मूल्यवर्धित कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी विविध निकषांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात. इंधन दरांमध्ये शेवटचा देशव्यापी बदल गेल्या वर्षी 21 मे रोजी झाला होता, जेव्हा वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी केला होता.
देशात विविध भागात इंधनाचे दर वेगवेगळे असतात. राज्य सरकार इंधनाच्या किमतींवर त्यांच्या पद्धतीनुसार व्हॅट लावतात, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतं वेगवेगळी असते. पण जर तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणुन घ्यायचे असेल तर तुम्ही एसएमएस पद्धतीद्वारे जाणुन घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना दिलेला RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल. हा कोड पाठवल्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या शहराती किंमत किती आहे ते माहिती होईल.