Photo Crdit- Social Media UPSC त प्रथम क्रमांक पटकावणारी कोण आहे शक्ती दुबे?
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. शक्ती दुबे या तरूणीने अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन रोल नंबर आणि नावाने त्यांचे निकाल तपासू शकतात. मुलाखत आणि मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल जाहीर होताच देशभरात ही शक्ती दुबे नक्की आहेतरी कोण, याबाबत उत्सुकता शिगेगा पोहचली आहे.
प्रयागराजच्या शक्ती दुबे यांनी चमकदार कामगिरी करत २०२४ च्या नागरी सेवा परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आज मंगळवारी नागरी सेवा परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर केला. शक्तीनंतर हर्षिता गोयल दुसऱ्या स्थानावर आहे.
UPSC CSE Final Result 2024: UPSCचा अंतिम निकाल जाहीर, एका क्लिकवर चेक करा रिझल्ट
शक्ती दुबे यांनी अलाहाबाद विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी (विज्ञान पदवी) पूर्ण केली आहे. यूपीएससीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की शक्तीने राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे पर्यायी विषय म्हणून परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
नागरी सेवा (पूर्व) परीक्षा, २०२४, गेल्या वर्षी १६ जून रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण ९,९२,५९९ उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यापैकी ५,८३,२१३ उमेदवारांनी परीक्षेला बसले होते. यापैकी एकूण १४,६२७ उमेदवार लेखी (मुख्य) परीक्षेत उत्तीर्ण झाले. मुख्य परीक्षा सप्टेंबर २०२४ मध्ये घेण्यात आली. यापैकी २,८४५ उमेदवारांना व्यक्तिमत्व चाचणी किंवा मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. यापैकी १,००९ उमेदवारांची (७२५ पुरुष आणि २८४ महिला) विविध सेवांमध्ये नियुक्तीसाठी यूपीएससीने शिफारस केली आहे. यापैकी, पहिल्या ५ मध्ये ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे.