पाठवणीच्या वेळी नवरीची अनोखी नौटंकी
पूर्वी मुलींची लग्ने झाली की पाठवणीच्या वेळी त्या खरंच खूप रडायच्या वा अनेक वधून या त्यावेळी खूप लाजाळू होत्या आणि कोणाशी बोलतानाही संकोच करायच्या. प्रत्येक विधीमध्ये बऱ्याच वधू या एकतर डोके टेकवून किंवा शांतपणे बसलेली दिसत असे. जसजसा काळ बदलला तसतशा मुलींच्या वागण्यातही बदल झालेला दिसून येत आहे आणि आता पाठवणीच्या वेळीही मुली वेगळ्याच वागतात असंही दिसून येत आहे, ज्याचे व्हिडिओही व्हायरल होत असता. आता तर नववधू स्वतःच्या लग्नात नाचते आणि तिच्या इच्छेनुसार प्रत्येक गोष्ट करताना दिसते. अशाच एका नववधूचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
नृत्य, गायन आणि विधींच्या व्हिडीओशिवाय हा वधूच्या निरोपाचा व्हिडिओ आहे. नववधूला निरोप दिला जात आहे आणि ती तिच्या आईला अशा काही गोष्टी सांगत आहे, जे ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही. मात्र, तिचे आईबरोबरचे हे बोलणे ऐकून तिच्या नवऱ्याला धक्काच बसला आहे हे तुम्हाला दिसून येईल, तुम्हीही हा मजेदार व्हिडिओ जरूर पहा (फोटो सौजन्य – iStock)
‘बदो-बदी’ म्हणत आईला निरोप
या व्हिडिओमध्ये एक नववधू आपल्या वरासह आई वडिलांना् निरोप देण्यासाठी कारमध्ये बसलेली आहे. Gen Z वधूचा निरोप खूपच मजेदार आहे. सासरच्या घरी न जाण्यासाठी ती अनेक गमतीशीर कारणे आईला देत रडत आहे. वधूने सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे आता तिला भांडी आणि कपडे धुण्यासाठी घरी सांगितले जाईल आणि तिला तोकडे कपडे देखील घालता येणार नाहीत. आई तिला समजावते की ही परंपरा आहे आणि ती पाळलीच पाहिजे. इतकेच नाही तर व्हिडिओच्या शेवटी वधू बदो – बदी आणि कच्चा बदाम गाताना दिसून येत आहे आणि तिच्या चेहऱ्यावरील हसूही थांबत नाहीये
हे पाहून तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया मात्र पाहण्यासारखी आहे. सध्याच्या व्हायरल व्हिडिओच्या जगात कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही. मात्र हा मजेशीर व्हिडिओ पाहून तुमचा दिवस नक्कीच भारी होईल.
Candy खाण्याच्या नादात मुलीचा तुडला जबडा, हातात आले दात; मित्रांना बसला धक्का
व्हिडिओ झाला व्हायरल
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर nikita__official08 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हे एका दिवसात 34 दशलक्ष म्हणजेच 3.4 कोटींहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. लोकांनी यावर कमेंटही केल्या आहेत आणि लिहिलं आहे की, ‘नवऱ्याकडे बघा, त्याला कसा धक्का बसला आहे.’ तर एका युजरने लिहिले की “वराला आश्चर्य वाटत आहे की तो नक्की घरी कोणाला घेऊन जात आहे.’ काही युजर्स म्हणाले की, ही खरी घटना नसून चित्रपटाच्या शूटिंगमधील दृश्य आहे. आता हे नक्की काय आहे ते व्हिडिओ बनवणाऱ्यांनाच माहीत. मात्र या व्हिडिओला तुफान प्रतिसाद मिळतोय हे नक्की
पहा मजेशीर व्हायरल व्हिडिओ
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.