नवी दिल्ली- संयुक्त अरब अमिरातमध्ये (United Arab Emirates) भीक मागणे हे अपराध मानण्यात येते. मात्र तिथं भीक (begging) मागण्याचा असा एक प्रकार समोर आलाय, की ज्यामुळं तपास करणारे आबुधाबीचे (Abu Dhabi) पोलीसही चक्रावले आहेत. पोलिसांनी एका महिला भिकाऱ्याला पाठलाग केला. त्यानंतर त्यांना सत्य समजलं. त्या महिलेकडं असलेली अलिशान कार आणि मोठी रक्कम आता पोलिसांनी जप्त केलीय. ही महिला दररोज शहरातल्या मशिदीत भीक मागत असे, आणि काम झाल्यावर अलिशान कारमधून घरी परतत असे. जेव्हा एका व्यक्तीला या महिलेच्या भीक मागण्याबबात संशय आला तेव्हा त्यानं ही माहिती पोलिसांना दिली.
चौकशीत पोलिसांना धक्का
ही महिला मशिदींमध्ये भीक मागत असल्याचा संशय आबूधाबीत राहणाऱ्या एका व्यक्तीला आला. त्यानंतर त्यानं या प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. याबाबत रितसर तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी बारकाईनं या महिलेवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर सत्य बाहेर आलं. ही महिला दिवसभर शहरातील अनेक मशिदींमध्ये भीक मागण्याचं काम करीत असे. त्यानंतर ती बऱ्याच दूर अंतरापर्यंत पायी जात असे. पोलिसांनी जेव्हा या महिलेचा पाठलाग केला, तेव्हा त्यांना समजलं की दूर अंतरावर तिची अलिशान कार पार्क करुन ठेवत असे. भीक मागून झाल्यानंतर ती या कारनं तिच्या घरी परतत असे. पोलिसांनी जेव्हा तिला अटक केली तेव्हा तिच्याकडून खूप मोठी रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. आता या महिलेविरोधात कठोर कारवाई पोलिसांनी केलीय.
वर्षभरात 160 भिकारी अटकेत
गेल्या वर्षभरात 160 भिकाऱ्यांना अटक केल्याचं आबूधाबीच्या पोलिसांनी सांगितलंय. भीक मागणं हा एक सामाजिक अभिशाप असल्याचं पोलिसांचं म्हणणंयं. संयुक्त अरब अमिरातमध्ये याला अपराधाचा दर्जा आहे. भिकारी लोकांच्या भावनांचा फायदा घेत त्यांची लुबाडणूक करतात, याला विरोध आहे. यूएईत भीक मागणाऱ्यांना 3 महिन्यांची शिक्षा आणि 1 लाख 11 हजारांचा दंड ठोठावण्यात येतो.