दिल्लीत यमुनेचे पाणी शिरण्यास सुरुवात (फोटो- ani)
देशातील अनेक राज्यांमध्ये महापूर
राजधानी दिल्लीत राज्य सरकार सतर्क
हजारो लोकांचे स्थलांतर
Delhi/Yamuna River Flood: देशभरात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. पंजाब, दिल्ली या राज्यांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. राजधानी दिल्लीत तर पुरस्थिती निर्माण झाली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश पाठोपाठ हरियाणा राज्यात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. यमुना नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे दिललीवर पुराचे संकट उभे राहिले आहे.
पावसाचा जोर वाढतच असल्याने यमुना नदीची पाणी पातळी वाढत आहे. दिल्लीतील अनेक भागात नदीचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवार पासून यमुना नदीचे पाणी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. प्रशासन सातत्याने बचावकार्य करत आहे. प्रशासन सतर्क झाले आहे. आतापर्यंत तब्बल 5 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
दिल्लीत काही भागात यमुनेचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. एनडीआरएफच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. हरियाणाच्या हाथिनीकुंड धरणातून मोठ्या प्रमान्यतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत महापुराचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
VIDEO | Delhi rains: Drone visuals show Kashmere Gate bus terminal inundated as the Yamuna river level continues to rise.#Delhi #YamunaRiver #YamunaWaterLevel #DelhiRains
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/f2DvJA6Tfs
— Press Trust of India (@PTI_News) September 4, 2025
दिल्लीतील लोहा ब्रिजनंतर आता, वजीराबाद ब्रिज बंद करण्यात आला आहे. अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले आहेत. वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यमुना बँक मेट्रो स्टेशनकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेला आहे. काश्मिरी बस गेट टर्मिनल पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे समजते आहे.
महापुरामुळे जनजीवन विस्कळीत
दिल्लीच्या यमुना बाजार, मजनू का टीला, मयूर विहार, गीता कॉलनी आणि झरोडा कलान यांसारख्या भागात घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. हवामान खात्याने या महिन्यातही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. खराब हवामान आणि पावसामुळे विमानसेवेवर परिणाम झाला आहे. काही विमाने उशिराने उड्डाण करत आहेत. तर काही विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
राजधानी दिल्लीत पावसाचा हाहा:कार; महापुरामुळे जनजीवन विस्कळीत, यमुना नदीचे पाणी…
दरम्यान, यमुना नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीबाबत डीएमआरसीने अलर्ट दिला आहे. यमुना नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे, यमुना बँक मेट्रो स्टेशनकडे जाणारा जोडणारा रस्ता सध्या दुर्गम आहे. स्टेशन कार्यरत असून, इंटरचेंज सुविधा उपलब्ध आहे. याबाबतची माहिती डीएमआरसीने दिली आहे. दिल्लीतील यमुना नदीकाठच्या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच वेळी, यमुना बाजारात असलेले खाजगी रुग्णालय रिकामे करण्यात आले आहे. आता तिथे एकही रुग्ण नाही. यमुनेच्या पुरात नालाही बुडाला आहे. नाला पुराच्या पाण्याने भरला आहे. काश्मिरी गेटवरून निगम बोध घाटाकडे येणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी पोहोचले आहे.