जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री; जवान शहीद, 3 दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या १५ तासात ३ दहशतवाद्यांना कठस्नान घालण्यात आलं आहे. एकीकडे सुरक्षादलांसोबत सोपोरमध्ये एका दहशतवादीला ठार करण्यात आलं असतानाच, किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. तर ४ जवान जखमी झाले आहेत. सुरक्षादलांना अनेक ठिकाणी नाकाबंदी केली असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. जखमी जवानांना तातडीन उपचार सुरू केले आहेत.
श्रीनगरनजीक जबरवानच्या जंगलात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. काही तासांपासून मोहीम सुरू होती. मात्र, त्यानंतर ऑपरेशन थांबविण्यात आलं कारण दहशतवादी झबरवानच्या जंगलात पळून गेले आहेत.किश्तवाडच्या जंगलातही दहशतवादी लपले होते. याठिकाणी झालेल्या चकमकीत नायब सुबेदार राकेश कुमार शहीद झाले आहेत तर ४ जवान जखमी झाले आहेत. तर सोपोरमध्येही जवानांनी एका दहशदवाद्याला कंठस्नान घातलं. काश्मीर पोलिसांनी सांगितलं की, बारामुला जिल्ह्यातील सोपोर परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला, त्याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. यात एक दहशदवादी ठार झाला आहे.
श्रीनगरच्या जबरवानच्या जंगलात दोन ते तीन दहशतवादी लपल्याचा माहिती लष्कराला मिळाली होती. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, दाचीगाम आणि निशात भागात जंगलात सकाळी 9 वाजता चकमक सुरू झाली होती. दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी परिसराची घेराबंदी केली आणि शोध मोहीम सुरू केली. काश्मीर डीआयजी राजीव पांडे यांनी सांगितलं की, दोन ते तीन दहशतवाद्यांचा शोध घेतला गेला, परंतु दुर्गम परिसरामुळे त्यांचं नेमकं लोकेशन सापडलं नाही. सुरक्षादलांवर गोळीबार करण्यात आला. दहशतवादी झबरवान पर्वतांच्या जंगलात पळून गेले आहेत. त्यामुळे ऑपरेशन आता थांबविण्यात आलं आहे.
हेही वाचा-Samarjit Ghatge: समरजीत घाटगेंसाठी कोल्हापूरकर मैदानात; ‘या’ संघटनांनी दिला जाहीर पाठिंबा
शनिवारी रात्री (9 नोव्हेंबर) सोपोरमध्ये सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत एका दहशतवादीला ठार करण्यात आलं. काश्मीर पोलिसांनी सांगितलं की, सोपोर परिसरातही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यावर आधारित एक संयुक्त अँटी-टेरर ऑपरेशन सुरू करण्यात आलं. शोध मोहिमेदरम्यान गोळीबार झाला आणि यामध्ये एका दहशतवादीला कठस्नान घालण्यात आलं.