नागपूर (Nagpur). नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची (corona positive patients) संख्या सातत्याने कमी झाली आहे. नागपूर महानगर पालिका (Nagpur Municipal Corporation) प्रशासनाकडून (administration) प्राप्त आरोग्य अहवालानुसार नागपूर शहरात बुधवारी 04 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ग्रामीण भागातील 01 आणि जिल्ह्याबाहेरील रुग्णसंख्या 01 आहे.
[read_also content=”नागपूर/ आंतरजातीय विवाहावर टिपणी केल्याने खून; गोंडेगाव शिवारातील घटना https://www.navarashtra.com/latest-news/murder-by-commenting-on-interracial-marriage-incident-in-gondegaon-shivar-nrat-159308.html”]
शहरात बुधवारी कोरोना बाधिताचा एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही. एकूण कोरोना active रुग्णसंख्या 218 इतकी आहे. बुधवारी 06 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले. शहरात कोरोना व्हॅक्सिनेशनचे प्रमाणही वाढले आहे. बुधवारपर्यंत कोरोना व्हॅक्सिनच्या पहिल्या डोजची आकडेवारी 8 लाख 55 हजार इतकी नोंदविली गेली. दुसऱ्या डोजची आकडेवारी 3 लाख 38 हजार इतकी नोंदविली गेली.