सोलापुरात उमेदवारी भरण्याला गर्दीचा उच्चांक
एबी फॉर्म वरून निवडणूक कार्यालयात गोंधळ
भाजप नेत्यांच्याविरुद्ध जोरदार आंदोलन
उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
सोलापूर: आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि भाजपा शहरध्यक्षा रोहीणी तडवळकर यांनी उमेदवारांसाठी आणलेल्या एबी फॉर्म निवडणूक कार्यालयात नेमून दिलेल्या वेळेनंतर जमा करत असल्याचा आरोप करत काँग्रेस, राकाँ (एपी) शिंदेसेना, उबाठा गटाने जोरदार विरोध करित सोलापूरचे आमदार कल्याणशेट्टी, रोहीणी तडवळकर यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी दाखल करण्यासाठी तोबा गर्दी झाली. पक्षाचा उमेदवार म्हणून अधिकृत एबी फॉर्म लवकर न मिळाल्यामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता. भाजप व काँग्रेस पक्षाने शेवटपर्यंत अधिकृत उमेदवारांबाबत गोपनीयता ठेवल्यामुळे उमेदवारांची अडचण झाली. शेवटच्या दिवशी नॉर्थकोर्ट प्रशाला येथे उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारांची मोठी रांग लागली होती. यामुळे हा परिसर वाहनं, बॅरिकेटिंग, आलेले उमेदवार आणि त्यांचे समर्थक या गर्दीत हरवून गेला होता.
सोमवार पर्यंत महापालिके निवडणुकीसाठी ४०० च्यावर अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने एकाच दिवशी किमान १००० अर्ज दाखल होतील अशी गर्दी दिसून आली. उमेदवारांमध्ये महिला, तरुण शिक्षित यांचाही मोठा भरणा दिसून आला. यात अनेक माजी नगरसेवक उमेदवारीच्या पावित्र्यात आहेत. यातील बहुतेकांनी पक्षही बदलले आहेत. अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी या ठिकाणी पक्षाचे शेले, झेंडे घेऊन येऊन उमेदवारी दाखल केली. पण ए.बी. फॉर्म त्यांच्या ताब्यात मिळाला नसल्याचे बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर साशंकता दिसत होती. त्यामुळे त्यांचे टेन्शन वाढलेले असतानाच पक्षप्रमुख ऐनवेळी एबी फॉर्म घेऊन आले. यात कोणाचा नंबर लागला हे मात्र लवकर कळू शकले नाही. त्यामुळे उमेदवारांचे समर्थक टेन्शनमध्ये दिसले.
भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच; बाबाराजे देशमुखांनी केला प्रवेश
सकाळी १० वाजल्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते डफरीन चौक जाणारा रस्ता दोन्ही बाजूने वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. यानंतर उमेदवार आणि त्यांच्या तीन ते चार समर्थकांनाच उमेदवारी भरण्यासाठी नार्थकोट कडे सोडण्यात येत होते. उमेदवारी दाखल करण्यासाठी काही तृतीयपंथीही आपल्या समर्थकांसह आले होते. त्यापैकी काही जणांनी उमेदवारी अर्ज विविध प्रभागातून दाखल केले आहेत. महापालिकेत एक खिडकी योजनेत विविध एनओसी दाखले घेऊन अनेक जण नॉर्थकोट प्रशालेत सुरू करण्यात आलेल्या निवडणूक कार्यालयात येत होते. या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुन्हा रांगा लागल्याचे दिसून आले.
दुपारी तीनच्या माहितीनुसार सकाळपासूनच तीनशेवर अर्ज दाखल झाले आहेत. अजूनही ५०० पेक्षा अधिक लोक रांगेत उभे असल्याचं दिसून आले. उमेदवारी दाखल करण्यासाठी बहुतेकांना मिरवणुकांसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे आवाजाचा गदारोळ या ठिकाणी कमी दिसून आला. अनेक जण ऐनवेळी मागितल्या जाणाऱ्या कागदपत्रांमुळे धांदलीच्या स्थितीत पळापळ करताना दिसून येत होते.
महाविकास आघाडीत बिघाडी, तर महायुतीतही बेबनाव; सांगलीत नेमकं घडतंय काय?
दुपारी तीन नंतर ही भाजपाचे एबी फॉर्म निवडणूक कार्यालयाकडून जमा करून घेतले जात आहे. आम्ही काँग्रेस, शिंदे सेना, राकाँ एपी आणि उबाठा पक्षानी विरुध्द केला आहे .
चेतन नरोटे
शहरध्यक्ष काँग्रेस सोलापूर






