श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय(फोटो-सोशल मीडिया)
IND vs SL W 5th T20I : भारतीय महिला संघ आणि श्रीलंका महिला संघ आज तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर आमनेसामने आले आहेत. या दोन संघात पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामना खेळला जात आहे. सामन्यापूर्वी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय महिला संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. श्रीलंकन संघात दोन बदल करण्यात आले आहे तर भारतीय संघ व्यवस्थापनाने या सामन्यासाठी स्मृती मानधनाला विश्रांती दिली आहे. कमलिनी भारतासाठी डावाची सुरुवात करताना दिसणार आहे.
हेही वाचा : ICC Ranking : दीप्ती शर्माचा जलवा कायम! शेफाली वर्मा, रिचा घोषने दाखवली कमाल; वाचा सविस्तर
हरमनप्रीत कौरचा भारतीय संघ मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या महिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकून निर्भेळ यश मिळवण्यासाठी सज्ज आहे. पुढील वर्षी जून-जुलैमध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारताच्या तयारीचा हा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सध्याच्या मालिकेनंतर, भारतीय संघ विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये प्रत्येकी तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळेल.
२०२४ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेतून भारतीय संघाला बाहेर पडावे लागले होते. परंतु त्यानंतर त्यांनी आपली शैली बदलली आहे आणि अधिक आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला आहे. या मालिकेत पहिल्या हिल्या तीन सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली, फलंदाजांकडून फार कमी प्रयत्न करावे लागले होते. तथापि, या सामन्यांमध्ये आक्रमक खेळणारी शफाली वर्मा चांगलीच फॉर्म मध्ये आहे. भारताची सर्वात मोठी चिंता म्हणजे त्याचे क्षेत्ररक्षण, ज्यामध्ये भारतीय संघाला निराशा पत्करावी लागली.
या मालिकेत भारतीय संघासाठी अनेक सकारात्मक बाबी दिसून आल्या आहेत. वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूरने एका वर्षाच्या विश्रांतीनंतर या स्वरूपात यशस्वी पुनरागमन केल असून नेहमीच विश्वासार्ह राहलेली दीप्ती शर्मा सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे. डावखुरी फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्मानेही तिच्या क्षमतेनुसार कामगिरी केली आहे. शफालीने फलंदाजीने सर्वांना प्रत्यभावीत केले आहे. तिने आतापर्यंत चार सामन्यांत तीन अर्धशतके झळकावली आहेत.
हेही वाचा : WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्समध्ये ‘ही’ स्टार खेळाडू सामील! तर RCB ला मोठा झटका; अष्टपैलू एलिस पेरीची माघार
भारत: शफाली वर्मा, जी कमलिनी, रिचा घोष (डब्ल्यू), हरमनप्रीत कौर (क), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, वैष्णवी शर्मा, श्री चरणी
श्रीलंका : हसिनी परेरा, चामारी अथापथु (क), इमेशा दुलानी, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षिका सिल्वा, रश्मिका सेवावंडी, कौशली नुथ्यांगना (डब्ल्यू), निमाशा मधुशानी, इनोका रणवीरा, मलकी मदरा






