नागपूर (Nagpur) : जिल्ह्यातील हाताबाहेर गेलेली कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने (The health department) आकाश-पाताळ एकवटले. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. दरम्यान जिल्ह्यात शनिवारी 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (Corona Positive patient in Nagpur) आढळून आले. यामध्ये शहरातील 10, ग्रामीण भागातील 4 रुग्णांचा समावेश आहे.
[read_also content=”धक्कादायक! लहान मुलांचे अश्लील फोटो समाजमाध्यमात Viral; सायबर पोलिसांकडून युजर्सचा शोध https://www.navarashtra.com/latest-news/child-pornography-spread-on-social-media-search-for-users-by-cyber-police-nrat-157073.html”]
नागपूर जिल्ह्यात आज एकूण 8578 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये शहरातील 7164 आणि ग्रामीण भागातील 1414 रुग्णांची नोंद प्राप्त अहवालात आहे. कोरोनामुक्त झालेल्या 17 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये नागपुरातील रुग्णांची आकडेवारी 12 आहे.
आरोग्य विभागातर्फे शहरात 8 लाख 2 हजार 704 रुग्णांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली. यासह 3 लाख 12 हजार 914 रुग्णांना कोरोनाची दुसरी लस देण्यात आली. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजर यांचा कटाक्षाने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.