कोलाहलापासून दूर, शांत जीवन जगावे असे अनेकांना वाटते, पण कुटुंबीय, दोस्त, नातेवाईकांना सोडून असे एकांतात जगणे वाटते तेवढे सोपे नक्कीच नाही. एका व्यक्तीने हे आव्हान नुसते स्वीकारलेच नाही तर गेली 20 वर्षे एकट्याने गुहेत काढलीही. मात्र एक दिवस जेव्हा तो शहरात आला तेव्हा त्याला नवीनच शब्द ऐकायला मिळाला,’ कोरोना’. कोरोनातला क सुद्धा कधी माहिती नसलेल्या या व्यक्तीला जेव्हा कोरोनाचा उपद्रव समजला तेव्हा त्याने सर्वप्रथम पहिले काम कुठले केले तर करोनाची लस घेतली.
70 वर्षाच्या हा माणूस द. सर्बिया मधल्या स्टार प्लानिना डोंगरात एका गुहेत गेली 20 वर्षे राहतो आहे. द. मिररच्या बातमीनुसार पेंटा पेट्रोवीक हा माणूस जगात ‘सोशल डीस्टन्सिंग किंग’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. गेली 20 वर्षे त्याचा बाहेरच्या समाजाशी काहीही संबंध नाही. आयुष्यात 50 वर्षे करावी लागलेली धडपण, काबाडकष्ट आणि दगदग यामुळे तो त्रस्त झाला होता आणि स्वातंत्र मिळविण्यासाठी पिरोट शहराजवळच्या या डोंगरातील गुहेत येऊन राहिला. तो जेव्हा शहरात परतला तेव्हा त्याला करोनाने जगभरात जो धुमाकूळ घातला त्याची माहिती मिळाली. तेव्हा सर्वप्रथम त्याने लसीकरण केंद्रात जाऊन लस घेतली. इतकेच नव्हे तर लसीचे तीन डोस घेणार असेही त्याने सांगितले.
पेंटा म्हणतो, लस घेतली नाही तर करोना माझ्या गुहेपर्यंत पोहोचला असता. गुहेत मी मजेत आहे. कुणाशी भांडण नाही, वादावादी नाही, सगळी शांतता. पेंटा नाल्यातील मासे पकडून खातो, भरपूर मश्रुम खातो आणि गवताच्या गादीवर झोपतो. त्याने तरुणपणात जो पैसा मिळविला तो सगळा दान केला आहे. पेंटा म्हणतो,’ पैसा माणसाचा भेजा खराब करतो. माणसाला पैशाशिवाय कुणीच भ्रष्ट करू शकत नाही.’
[read_also content=”धावते विमान पकडण्याचा प्रयत्न! तालिबानी दहशतीने घेतला जीव; अफगाणिस्तानात विमान हवेत असताना तीन जण पडले https://www.navarashtra.com/latest-news/trying-to-catch-a-running-plane-taliban-terrorized-three-people-fell-while-the-plane-was-in-the-air-in-afghanistan-nrvk-170020.html”]
[read_also content=”चार कार पैशांनी भरल्या, हेलिकॉप्टरमध्येही पैसे कोंबले, काही पैसे रस्त्यावर पडले; अफगाणिस्तानचे राष्ट्रपती गेले कुठे? https://www.navarashtra.com/latest-news/four-cars-filled-with-money-even-in-a-helicopter-money-crashed-some-money-fell-on-the-road-where-did-the-president-of-afghanistan-go-nrvk-170034.html”]
[read_also content=”अफगानिस्तानात तालिबानी अत्याचाराचा कहर; अडकलेल्या भारतीयांचा काय करायचे? मोदी सरकारसमोरचे पाच प्रश्न https://www.navarashtra.com/latest-news/four-cars-filled-with-money-even-in-a-helicopter-money-crashed-some-money-fell-on-the-road-where-did-the-president-of-afghanistan-go-nrvk-170034.html”]
[read_also content=”अफगाणिस्तानात तालिबानी हुकूमत! पाकिस्तान, चीन, इराणचा तालिबानला पाठिंबा https://www.navarashtra.com/latest-news/taliban-rule-in-afghanistan-pakistan-china-iran-support-taliban-nrvk-170043.html”]
[read_also content=”आत्महत्येपूर्वी पूजा मद्यधुंद होती! व्हिसेरा अहवालात मोठा खुलासा; राठोड यांच्या अडचणी कायम https://www.navarashtra.com/latest-news/pooja-was-drunk-before-committing-suicide-big-revelation-in-the-viscera-report-rathores-problems-persist-nrvk-165091.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”19 वर्षीची पोरगी ६७ वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि… https://www.navarashtra.com/latest-news/19-year-old-girl-married-to-old-man-sit-will-investigate-nrvk-164601.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html”]
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]