• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • Devotion Vs Selfishness In Jai Jai Swami Samarth Will Swami Samarth Deliver Justice To The Devotees

Jai Jai Swami Samarth मध्ये भक्ती विरुद्ध स्वार्थाची लढाई, भक्ताला न्याय मिळवून देणार का स्वामी समर्थ?

जय जय स्वामी समर्थ मालिकेच्या येत्या भागात श्रद्धा, अहंकार आणि कलेची मोठी परीक्षा पाहायला मिळणार आहे. श्रद्धेच्या शक्तीसमोर स्वार्थाचे आव्हान उभे राहणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 21, 2026 | 07:20 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका जय जय स्वामी समर्थ मालिकेच्या येत्या भागात श्रद्धा, अहंकार आणि कलेची मोठी परीक्षा पाहायला मिळणार आहे. श्रद्धेच्या शक्तीसमोर स्वार्थाचे आव्हान उभे राहणार आहे. योग्य व्यक्तीला त्याच्या कलेचे खरे श्रेय मिळावे, यासाठी स्वामी काय करणार? हे विशेष भागात उलगडेल.

राजदरबारातील नवरत्नांपैकी गोवर्धन हा एक प्रसिद्ध चित्रकार आहे. पण वय वाढल्यामुळे आणि आजारपणामुळे त्याचे हात थरथरू लागले आहेत. त्यामुळे त्याची चित्रकला पूर्वीसारखी राहिलेली नाही. राजाकडून त्याला वारंवार टीका सहन करावी लागते आणि त्याचे पद कधीही जाऊ शकते अशी परिस्थिती आहे.

गोवर्धनची इच्छा आहे की त्याचा मुलगा मुकुंद याने त्याची जागा घ्यावी आणि चित्रकलेचा वारसा पुढे न्यावा. मात्र मुकुंदमध्ये ती कला आणि जादू नाही. स्वामी स्पष्ट सांगतात की मुकुंद हा त्याच्या कलेचा योग्य वारसदार नाही.

स्वामींनी मुकुंद हा कलेचा योग्य वारसदार नाही असे स्पष्ट सांगितल्यावर तो संतापतो. “रक्तातून गुण येतातच. मी बाबांइतकाच चांगला चित्रकार आहे,” असे म्हणत तो स्वतःला सिद्ध करण्याचा निर्धार करतो आणि स्वामींनाच आव्हान देतो.

दरम्यान, राजदरबारातून गोवर्धनला मोठा आदेश येतो. होळीपूर्वी राजेसाहेबांना स्वामींचे तैलचित्र भेट द्यायचे असते आणि ते चित्र गोवर्धनने तयार करायचे असते. यासाठी मोठा मोबदला जाहीर केला जातो. आजारपणामुळे खचलेला गोवर्धन हा प्रस्ताव नाकारण्याचा विचार करतो. मात्र पैशाच्या मोहात पडून मुकुंद हे चित्र स्वतः काढण्याची जबाबदारी घेतो.

याच वेळी अंबिका नावाची तरुणी, जी आर्थिक अडचणीत आहे पण उत्तम कलाकार आहे, स्वामींच्या भक्तीने प्रेरित होऊन त्यांचे सुंदर चित्र रेखाटते. तिच्या चित्रात दिव्य तेज दिसून येते. मुकुंदला हे कळताच तो तिला पैशाचे आमिष दाखवून ते चित्र विकत घेतो आणि स्वतःच्या नावाने राजदरबारात सादर करतो.

Malaika Arora 19 वर्षांनी छोट्या बिजनेसमॅनसोबत रिलेशनशिपमध्ये? रोममध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय अभिनेत्री, पहिली रोमँटिक झलक चर्चेत

मुकुंद आणि सरस्वतीचा एक निर्णय आणि अंबिकेची एक तडजोड या सगळ्याचा परिणाम काय होणार? कला की व्यापार? श्रद्धा की गरज? होळीच्या निमित्ताने स्वामी सांगतात, “या वेळी केवळ होळी पेटणार नाही… काही अहंकार, काही गैरसमज, काही भ्रमही जळून खाक होतील.” राजेसाहेबांच्या उपस्थितीत स्वामींना चित्र अर्पण होणार आहे. पण त्या चित्रामागचं सत्य काय आहे? ते सत्य उघड झालं तर कोणाची प्रतिष्ठा राखली जाईल आणि कोणाचा मुखवटा गळून पडेल?

एका बाजूला अंबिकेची निष्कलंक भक्ती, दुसऱ्या बाजूला मुकुंदचा महत्त्वाकांक्षी अहंकार आणि मधोमध स्वामींचं शांत, अर्थपूर्ण स्मित… या होळीमध्ये जळणार काय आणि उजळणार काय याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. आता स्वामी योग्य व्यक्तीला न्याय आणि श्रेय कसे मिळवून देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Anupam Kher यांना भावला ‘Subedar’चा ट्रेलर; Anil Kapoor यांच्या कामाचे कौतुक करत म्हणाले…

Web Title: Devotion vs selfishness in jai jai swami samarth will swami samarth deliver justice to the devotees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Colours Marathi
  • marathi serial news
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

शुभमंगल सावधान! मराठी अभिनेत्री रेवती लेले अडकली लग्नबंधनात, ना अभिनेता ना दिग्दर्शक ‘या’ व्यक्तीशी बांधली लग्नगाठ
1

शुभमंगल सावधान! मराठी अभिनेत्री रेवती लेले अडकली लग्नबंधनात, ना अभिनेता ना दिग्दर्शक ‘या’ व्यक्तीशी बांधली लग्नगाठ

Shree Swami Samarth : जेव्हा स्वामी पहिल्यांदा रडले ; गोष्ट आहे दत्तसंप्रदायातील एका थोर भक्ताची
2

Shree Swami Samarth : जेव्हा स्वामी पहिल्यांदा रडले ; गोष्ट आहे दत्तसंप्रदायातील एका थोर भक्ताची

Inspector Manju मध्ये नवा ट्विस्ट; सत्या–मंजूच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री!
3

Inspector Manju मध्ये नवा ट्विस्ट; सत्या–मंजूच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री!

Exclusive: ‘चौकटीबाहेरचं काम, ‘देवबाई’ म्हणून मिळाली ओळख,’ लालीची भूमिका फळली
4

Exclusive: ‘चौकटीबाहेरचं काम, ‘देवबाई’ म्हणून मिळाली ओळख,’ लालीची भूमिका फळली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Jai Jai Swami Samarth मध्ये भक्ती विरुद्ध स्वार्थाची लढाई, भक्ताला न्याय मिळवून देणार का स्वामी समर्थ?

Jai Jai Swami Samarth मध्ये भक्ती विरुद्ध स्वार्थाची लढाई, भक्ताला न्याय मिळवून देणार का स्वामी समर्थ?

Feb 21, 2026 | 07:20 PM
‘या’ कंपनीच्या तब्बल 6.42 लाख SUV मध्ये आली खराबी; आता रिकॉल जारी, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

‘या’ कंपनीच्या तब्बल 6.42 लाख SUV मध्ये आली खराबी; आता रिकॉल जारी, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

Feb 21, 2026 | 07:12 PM
शेअर्समध्ये होणार मोठी घसरण?, हा शेअर विकून टाका अन्यथा…, ब्रोकरेजचा मोठा इशारा

शेअर्समध्ये होणार मोठी घसरण?, हा शेअर विकून टाका अन्यथा…, ब्रोकरेजचा मोठा इशारा

Feb 21, 2026 | 07:08 PM
IMD Rain Alert: भयंकर घडणार! कमी दाबाचा पट्टा…; ‘या’ राज्यांना पाऊस अक्षरश: रडवणार

IMD Rain Alert: भयंकर घडणार! कमी दाबाचा पट्टा…; ‘या’ राज्यांना पाऊस अक्षरश: रडवणार

Feb 21, 2026 | 06:55 PM
Washim News : गाडगेबाबांच्या दशसूत्रीचे पालन करा! सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन

Washim News : गाडगेबाबांच्या दशसूत्रीचे पालन करा! सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन

Feb 21, 2026 | 06:48 PM
Amravati Assembly : अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका

Amravati Assembly : अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका

Feb 21, 2026 | 06:48 PM
Malaika Arora 19 वर्षांनी छोट्या बिजनेसमॅनसोबत रिलेशनशिपमध्ये? रोममध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय अभिनेत्री, पहिली रोमँटिक झलक चर्चेत

Malaika Arora 19 वर्षांनी छोट्या बिजनेसमॅनसोबत रिलेशनशिपमध्ये? रोममध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय अभिनेत्री, पहिली रोमँटिक झलक चर्चेत

Feb 21, 2026 | 06:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.