21 Crores For District Under Repair Of Old Roads And Bridges Says Rajendra Patil Yadravkar Nrka
पुरहानी रस्ते व पूल दुरुस्ती अंतर्गत जिल्ह्यासाठी २१ कोटी : राजेंद्र पाटील-यड्रावकर
ऑगस्ट २०२१ मध्ये आलेल्या महाप्रलयकारी महापुरामुळे शेतीपिकांसह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. त्याचबरोबर रस्ते तसेच गावांना जोडणारे छोटे-मोठे पूल नादुरुस्त झाले होते.
जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ऑगस्ट २०२१ मध्ये आलेल्या महाप्रलयकारी महापुरामुळे शेतीपिकांसह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. त्याचबरोबर रस्ते तसेच गावांना जोडणारे छोटे-मोठे पूल नादुरुस्त झाले होते. या रस्त्यांसाठी व छोट्या-मोठ्या पुलांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने पूरहानी दुरुस्ती कामांतर्गत शिरोळ तालुक्यासाठी ७ कोटी ६० लाख तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी जवळपास २१ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केला आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
सलग दोन महापुरानंतर तालुक्याचे मोठे नुकसान झाले होते. शिरोळ तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते आणि पूल या संदर्भित कामांचा सर्वे करून दुरुस्तीसाठी अपेक्षित खर्चाबाबत चे अंदाज पत्रक सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांच्याकडे सादर करावेत असे आदेश दिले होते, त्याचा अहवाल तयार करण्यात आला होता.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व राज्यमंत्री दत्ता भरणे यांना पुरबाधीत क्षेत्रांमधील रस्ते व पुलांच्या एकूण नुकसानीबाबत अवलोकीत करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने याबाबतची पुढील कार्यवाही पूर्ण करून रस्ते व पूल दृरूस्तीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असेही शेवटी राज्यमंत्री यड्रावकर यांनी म्हटले आहे.
Web Title: 21 crores for district under repair of old roads and bridges says rajendra patil yadravkar nrka