अलीकडे काही दिवसात देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे (India Corona Update) देशाची चिंता वाढत असताना गेल्या 24 तासांत देशातील कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट पाहायला मिळाली. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या नव्या 2,961 रुग्णांची नोंद करण्यात आली. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 33,232 वरून 30,041 आली आहेत. काल देशात3,361 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या 24 तासात 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये केरळमधील 9 जणांचा समावेश आहे.
[read_also content=”विमानानं उड्डाण घेताच प्रवाशाला चावला विंचू! नागपूर-मुंबई फ्लाईटमध्ये एकच खळबळ, तातडीनं नेण्यात आलं रुग्णालयात https://www.navarashtra.com/world/passenger-was-bitten-by-a-scorpion-after-the-plane-took-off-incident-in-mumbai-nagpur-flight-nrps-395531.html”]
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार,
गेल्या 24 तासात 17 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले असून या संख्येसोबतच आता देशभरातील आतापर्यंतची कोरोना मृतांची संख्या 5,31,659 झाली आहे. तर नवीन रुग्ण आढळ्यानंतर, देशात कोविड संसर्गाने ग्रस्त लोकांची संख्या 4.49 कोटी (4,49,67,250) नोंदवली गेली आहे. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,44,05,550 पर्यंत वाढली आहे आणि सक्रिय प्रकरणे आता एकूण संक्रमणांपैकी 0.07 टक्के आहेत. मंत्रालयाने सांगितले की राष्ट्रीय कोविड-19 पुनर्प्राप्ती दर 98.75 टक्के नोंदविला गेला आहे, तर मृत्यू दर 1.18 टक्के नोंदविला गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.