इराणची उलटी गिनती सुरु! अमेरिकेच्या 'त्या' बॉम्बने उडणार अणुकेंद्राच्या ठिकऱ्या, काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
US Iran War Alert : इराणचा नकाशा बदलणार? ट्रम्प यांचा ‘Kill List’ प्लॅन तयार; खामेनेई निशाण्यावर
नुकतेच अमेरिकेने इराणवरील हल्ला पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे. परंतु अमेरिकेच्या या लष्करी पावलाने मात्र मोठ्या युद्धाचे संकेत दिले आहेत. पण मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने बोईंग कंपनीसोबत १०० दशलक्ष डॉलर्सचा मोठा संरक्षण करार केला असून हा करार अंतिम टप्प्यात आहे. लवकरच GBU-57 बंकर बस्टर बॉम्ब अमेरिकेच्या लष्करात सामील होण्याची शक्यता आहे. यावरुन अमेरिकेची भविष्यातील युद्ध तयारी आणि सुरक्षा धोरणांचे प्रतिबिंब दिसून येते.
सध्या अमेरिकेच्या शक्तिशाली बंकर बस्टर खरेदी करण्याच्या निर्णयाने इराणवरील मिडनाई हॅमर ऑपरेशनची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. गेल्या वर्षी २२ जून २०२५ रोजी अमेरिकेने इराणच्या अणु केंद्रांवर मोठा हल्ला केला होता. याला ऑपरेशन मिडनाई हॅमर नाव देण्यातआले होते. या हल्ल्यात देखील अमेरिकेने सर्वात घातक 14 MOP बॉम्ब्सचा वापर केला होता. यामुळे GBU-57 च्या अमेरिकेच्या खरेदीमुळे पुन्हा इराणवर ऑपरेशन मिडनाईट हॅमर होणार का अशा चर्चांणा उधाण आले आहे.






