न्यूझीलंडविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी भारताची प्लेइंग-११ निश्चित (Photo Credit- X)
अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघात दोन महत्त्वाचे बदल होतील, अशी चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली होती. विशेषतः खराब फॉर्मशी झुंजणारा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि महागडा ठरलेला फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. वरुणच्या जागी अनुभवी कुलदीप यादवला संघात स्थान मिळावे, अशी मागणी चाहत्यांकडून होत होती.
🚨 BIGGEST UPDATE ON TEAM INDIA’S PLAYING 11 🚨 • No change in India’s playing 11 vs New Zealand of T20 World Cup final.[Devendra Pandey] pic.twitter.com/5icYZtewFr — Cricket Central (@CricketCentrl) March 8, 2026
मात्र, मिळालेल्या वृत्तानुसार, संघ व्यवस्थापन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव हे ‘विनिंग कॉम्बिनेशन’मध्ये बदल करण्यास उत्सुक नाहीत. सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवण्यासाठी भारत आपल्या जुन्याच यशस्वी प्लेइंग-११ सह मैदानात उतरेल.
वरुण चक्रवर्तीने या विश्वचषकात आतापर्यंत १३ बळी घेतले आहेत. मात्र, सुपर-८ फेरीत त्याची ज्या प्रकारे धुलाई झाली, त्यामुळे भारताची गोलंदाजी केवळ जसप्रीत बुमराहवर अवलंबून असल्याचे दिसून आले. ७ मार्च रोजी झालेल्या सराव सत्रात वरुण आणि कुलदीप या दोघांनीही गोलंदाजीचा सराव केला होता. वरुण सराव अर्धवट सोडून गेला होता, तर कुलदीपने बराच वेळ घाम गाळला होता. यावरून वरुणला बाहेर बसवले जाईल असे वाटत होते, परंतु अखेर व्यवस्थापनाने त्याच्या अनुभवावरच शिक्कामोर्तब केले आहे. दुसरीकडे, सलामीवीर अभिषेक शर्मा या स्पर्धेत तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे. झिम्बाब्वेविरुद्धची ५५ धावांची खेळी वगळता त्याला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. तरीही त्याच्या आक्रमक शैलीवर विश्वास ठेवून त्याला अंतिम सामन्यात खेळवले जाणार आहे.
जर आज भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केला, तर क्रिकेटच्या इतिहासात अनेक नवे विक्रम प्रस्थापित होतील:






