US Iran War : 'ट्रम्प यांना सोडणार नाही' ; खामेनेईंच्या हत्येनंतर पेटून उठला इराण; अमेरिकेला दिली थरकाप उडवणारी धमकी (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
US Iran War : ‘इराण कधीच झुकणार नाही’ ; राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी अमेरिकेला स्पष्टच सांगितले
खामेनेईंच्या हत्येनंतर इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांनी अमेरिके राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना उघड धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही ट्रम्प यांना सोडणार नाही, त्यांना आपल्या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.’ लारीजानी यांनी म्हटले की, आमच्या नेत्याला आणि हजारो निष्पाप नागरिकांना मारल्याचा बदला घेतल्याशिवाय इराण शांत बसणार नाही. त्यांनी हा लढा दीर्घकाळ आणि शेवटपर्यंत सुरु राहिल असाही इशारा दिला.
याच वेळी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनीही अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणच्या स्वाभिमानाचा एक इंच तुकडाही कोणाला घेऊ दिला जाणार नाही. ते केवळ आमचे आत्मसमर्पणाचे स्वप्नच पाहू शकतात.
त्यांनी स्पष्ट केले आहे की, इराण कोणत्याही देशावर हल्ला करण्यास उत्सुक नाही. परंतु कोणी इराणच्या सार्वभौमत्वला आणि प्रादेशिक अखंडतेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात. येईल. आमच्या भूमीला वाचवण्यासाठी आम्हा शांत बसणाक नाही. कोणत्याही थराला जाणून राष्ट्राचे रक्षण करु, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
दुसरीकडे मात्र ट्रम्प यांनी इराणच्या धमक्यांना धूडकावून लावले आहे. इराणची लष्करी क्षमता पूर्णपणे उद्धवस्त केल्याशिवाय थांबणार नाही. आता शांततेने चर्चा करण्याची वेळ निघून गेली असून केवळ आत्मसमर्पणाचा पर्याय इराणसमोर राहिलेला आहे असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. तसेच इराण शरणागती पत्करत नाही तोपर्यंत हल्ले सुरुच राहतील असेही त्यांनी म्हटले आहे.
Oil Imports : ‘परवानगीची गरज नाही’ ; रशियन तेल खरेदीवरून भारतानं अमेरिकेला दिलं स्पष्ट उत्तर
Ans: इराणच्या नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलचे सचिव अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांना धमकी दिली आहे.
Ans: त्यांनी म्हटले की इराण आपल्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूचा बदला घेईल.
Ans: २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात संयुक्त लष्करी कारवाई केली होती. या वेळी केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मृत्यू झाला.
Ans: ट्रम्प यांनी इराणच्या धमक्यांना धूडकावू लावले असून याचा त्यांना काही फरक पडत नसल्याचे म्हटले आहे. तसेच इराणने कोणत्याही अटीशिवाय शरणागती पत्करावी अन्यथा हल्ले सुरूच राहतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.






