तब्बल 70 वर्षानंतर भारतात आत चित्त्याचं (Cheetah) दर्शन होणार आहे. प्रोजेक्ट प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत नामिबियामधून आठ चित्ते आज भारतात आणण्यात आले. हे आफ्रिकन चित्ते असून आता यांचा मुक्काम भारतात असणार आहे. नामिबिया येथून विशेष विमानानं या चित्त्यांचं भारतात आगमन झालं आहे. या चित्त्यांना मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहेत.
[read_also content=”आता आयांच्या डोक्याला होणार ताप! मिळणार नाही ‘तो मुलायम स्पर्श’ मुंबईतील जॉन्सस बेबी पावडर कायमस्वरूपी भोगणार कर्माची फळं https://www.navarashtra.com/maharashtra/license-of-johnsons-baby-powder-in-mumbai-permanently-revoked-nrvb-326872.html”]
मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमध्ये या चित्त्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. 1952 साली भारतातून चित्ते नामशेष झाले होते. भारतातून चित्ते नामशेष झाल्यानंतर 1970 साली देशात आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रयत्न सुरु केले होते. मात्र तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने यासाठी परवानगी नाकारली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली. आणि आता 2022 मध्ये हा प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत या चित्त्यांना भारतात आणण्यात आलं.






