अभिनेत्री दीपिका पादुकोण सप्टेंबर महिन्यात गोंडस बाळाला जन्म देणार आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने घरी बाळाचे आगमन होण्यापूर्वी एक फोटोशूट शेअर केले आहे. लग्नाच्या ६ वर्षानंतर पहिल्यांदाच रणबीर- दीपिका आई- बाबा होणार आहेत.
"बेबी सिंबाचा डेब्यू चित्रपट..." रणवीर-दीपिकाच्या लेकीने जन्माआधीच केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण
अभिनेत्री दीपिका पादुकोण सप्टेंबर महिन्यात एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने घरी बाळाचे आगमन होण्यापूर्वी काही फोटोशूट शेअर केले आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच रणबीर- दीपिका आई- बाबा होणार आहेत..
ब्लॅक अँड व्हाईट अंदाजात रणबीर- दीपिकाने हे खास फोटोशूट केले असून प्रेग्नन्सीमध्ये दीपिकाचा सर्वात बोल्ड अंदाज या फोटोमधून पाहायला मिळाला आहे.
शेअर केलेल्या फोटोंवर दीपिकाचा बेबी बंप फ्लॉंट होत असून चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे..
ब्लॅक शर्ट आणि नेटचा आकर्षक ड्रेस वेअर करून अभिनेत्रीने हे खास फोटोशूट केले आहे.
तर रणबीरने टीशर्ट आणि जीन्समध्ये हे खास फोटोशूट केले आहे.
प्रेग्नेंसीच्या काळातही दीपिका फॅशन सेन्स फॉलो करताना दिसत आहे.
मॅटर्निटी फोटोशूटमध्ये रणवीरचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
दीपिका पदुकोणला आपल्या मुलीला कौटुंबिक वातावरणात वाढवायचे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री तिच्या मुलीचा चेहरा दिसणारा कोणताही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणार नाही.
दीपिका भविष्यात मुलीचे संगोपन करण्यासाठी आलिया आणि ऐश्वर्याच्या पालकत्वाची स्टाईल वापरण्याची शक्यता आहे. ऐश्वर्याने लेकीचे संगोपन करण्यासाठी स्वत: इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. ऐश्वर्याने नॅनीची मदत न घेता स्वत: आराध्याचे पालनपोषण केले होते.
दीपिका व रणवीरने एकमेकांना अनेकवर्षे डेट केल्यावर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली.