बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) नुकताच झुंड चित्रपट पाहिला. आमिरसाठी या चित्रपटाचं प्रायव्हेट स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं. हा चित्रपट पाहिल्यानंतर आमिरचे डोळे पाणावले. टी सीरिजनं त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आमिर झुंड चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
झुंड चित्रपट पाहिल्यानंतर आमिर म्हणाला, ‘हा चित्रपट यूनिक आहे. सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं आहे. मी 20 -30 वर्षात जे काही शिकलो त्या सर्व गोष्टींचा यांनी फूटबॉल केलाय, असं म्हणता येईल. ‘ या चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाबद्दल आमिर म्हणाला, ‘अमिताभ बच्चन यांनी अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे पण हा त्यांच्या सर्वात चांगल्या चित्रपटांमधील एक चित्रपट आहे. तसेच या चित्रपटात लहान मुलांनी देखील चांगलं काम केलं आहे. ‘ चित्रपट पाहिल्यानंतर आमिर या चित्रपटातील कलाकारांना भेटला.