फोटो सौजन्य सोशल मिडिया
Amit Thackeray : गणेश उत्सवाचे वातावरण राज्यात सुरु असताना लहान लहान मुलांच्या अंगाला सिल्वर व केमिकलचे रंग लावून त्यांना देव किंवा महापुरुषांच्या रुपात उभं केलं जात आहे. त्यांच्याकडून भीक मागून घेतली जात आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे या साठी महाराष्ट्राचे तसेच मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी ट्विटर अकांऊट द्वरे पोस्ट करत हे प्रकरण अतिशय भिषण असल्याचे म्हंटले आहे.
सद्या गणेश उत्सवाचे वातावरण सुरु असल्या मुळे काही पालक आणि नातेवाईक लहान मुलांच्या अंगाला सिल्वर व केमिकलचे रंग लावून त्यांना देव किंवा महापुरुषांच्या रुपात उभं करत आहे. त्यांना भिक मागायला लावतात हे चित्र कोठे तरी थांबले पाहिजे, हे चित्र अतिशय भिषण आहे. असे स्पष्टचं मत अमित ठाकरे यांनी केले आहे.
गणेशोत्सव सुरू आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. पण या सगळ्यात रस्त्यावर एक गोष्ट पाहायला मिळते आहे..
लहान लहान मुलांच्या अंगाला सिल्वर केमिकलचे रंग लावून त्यांना देव किंवा महापुरुषांच्या रुपात उभं केलं जात आहे आणि त्यांच्याकडून भीक मागून घेतली जात आहे. हे अतिशय भीषण आहे!
माझं… pic.twitter.com/d832GkyE6O — Amit Thackeray (@amitrthackeray) September 21, 2026
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सैनिकांना आणि नागरिकांना आवाहन करत म्हंटले आहे . की जिथे कुठे असा प्रकार घडताना दिसत असेल तर तो तिथल्या तिथे आपण थांबवला पाहिजे. त्यांच्या कुंटुंबाला मदत हवी असल्यास आपण मदत करु, मी स्वत:सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहिण.
गणेश उत्सवाचे वातावरण सुरु असल्या मुळे काही पालक आणि नातेवाईक लहान लहान मुलांच्या अंगाला सिल्वर व केमिकलचे रंग लावून त्यांना देव किंवा महापुरुषांच्या रुपात उभं करुन भीक मागाला लावता आहेत. या सर्वांन मध्ये लहान मुलांचं असं शोषण अजिबात होऊ देऊ नका. हे चित्र आपल्याला बदलायचंच आहे. जिथे असं दिसेल, तिथे ही गोष्ट त्वरित थांबवा! असे आव्हान अमित ठाकरे यांनी ट्विटर अकांऊट वर पोस्ट करत म्हंटलं आहे.
कोणत्याही बालशोषण किंवा बालभिक्षेच्या विरोधात त्वरित मदत करण्यासाठी 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करुन सदर घटनेची तक्रार करावी व माहिती आणि लोकोशन पोलीस ठाण्यात द्यावी. स्थानिक पोलिसांना 100 नंबर आणि 112 क्रमांकावर तक्रार करावी. बालकल्याण समिती कडे तक्रार करावी किंवा स्थानिक (एनजीओची ) बालहक्कांसाठी काम करणाऱ्या स्थानिक संस्था किंवा कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलवून मदत करा.






