आज हिंदुत्वाचे कैवारी, हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कोरोनामुळं मागील दोन वर्षात शिवजयंती साजरी करण्यासाठी काही निर्बंध होते, पण आता मोठ्या दिमाखात शिवजयंती साजरी होत आहे. सध्याच्या घडीला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश कोण कोण आहेत, आणि सध्या ते काय करत आहेत असा अनेकांना प्रश्न पडत आहे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांचे राजकारणातील आजचे स्थान याचा आज आपण आढावा घेणार आहोत.
सुर्यवंशी क्षत्रिय मराठे भोसले घराणे हे महाराष्ट्रात चंद्रवंशी यादव यांच्या काळानंतर, सर्वात जास्त लोकप्रीय जनतेचे भले पाहणारे घराणे म्हणुन उदयास आले. या कुळामधे शहाजीराजे, शिवाजीराजे, शंभुराजे सारखे युध्दकुषल धुरंदर तशेच राजाराम महाराज, शाहुराजे सारखे राजनिती निपुन योध्द्यांनी जन्म घेतला आहे.भोसले घराणे पुर्वीचे शिसोदे घराणे आहे जे बाप्पा रावळ यांच्या वंशातुन तदपुर्वी प्रभू श्रीरामाच्या वंशातुन आलेले आहे. शिवरायांचा वारसा शंभुजीराजे राजाराम महाराज, शाहुराजे यांनी पुढे चालवून अखंड दुस्थानात मराठा साम्राज्य प्रस्थापित केले. शहाजीराजे आणि जिजाबाई यांना संभाजी आणि शिवाजी छत्रपती हे जिजाबाईचे दोन पुत्र आणि तुकाबाईचा व्यंकोजी ऊर्फ एकोजी (तंजावर राज्याचा संस्थापक). या तिघांनी पुढे इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. संभाजी कर्नाटकात शहा
भोसले कुळच्या मूलस्थानाविषयी तसेच प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकापासून (१६७४) भोसले घराण्याचा उदेपूरच्या शिसोदे (राजपूत) कुळाशी संबंध जोडण्यात आला. या घराण्यातील पहिला ज्ञात पुरुष बाबाजी भोसले. त्यांचे दोन पुत्र मालोजी (मृ, १६०७) आणि विठोजी हे वेरुळ-घृष्णेश्वर भागात निजामशाहीच्या आश्रयाने प्रथम उदयास आले. पुणे जिल्ह्यातील पुणे व सुपे या जहागिरी मालोजींकडे होत्या. मालोजींस दोन पुत्र होते शहाजीराजे आणि शरीफजी..
संभाजी कर्नाटकात शहाजी राजांजवळ राहत होते. कनकगिरीच्या लढाईत (१६५४) पस्तीशीतच ते वारले. एकोजींनी शहाजीनंतर तंजावर येथे नवी गादी स्थापन केली. तर शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना १६४१ मध्ये जिजा समवेत पुणे-सुपे ही आपली जहागीर संभाळण्यासाठी महाराष्ट्रात कायमचे पाठवून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांना २ मुले. एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि दुसरे राजाराम महाराज होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकस्मिक मृत्यूनंतर रायगडावर युवराज संभाजी छत्रपतींनी राज्याभिषेक करवून घेतला आणि छत्रपतीची सूत्रे हाती घेतली. मराठा साम्राज्याच्या विनाशाची प्रतिज्ञा घेऊन दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाशी लढताना संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. नंतर छत्रपतीपद आले धाकटे बंधू राजाराम महाराज यांच्याकडे त्यांच्या मागावर असलेल्या मुघलांना झुगारा देऊन राजाराम महाराज आपल्या कुटुंबियांसह विश्वासू सैनिकांबरोबर पन्हाळ्यामार्गे जिंजीकडे गेले.
छत्रपीत संभाजी महाराज
छत्रपीत संभाजी महाराजानंतर (१७६०) छत्रपती शिवरायांचा औरस वंश खुंटला व पुढे दत्तकाची परंपरा सुरू झाली. छत्रपती संभाजी महाराजाना दोन एक मुलगी आणि एक शाहू मुलगा होता असे इतिहासात नोंद आहे, पण त्यांच्या मृत्यृनंतर पुढ्च्या वंशाजांचे काय झाले किंवा कोण आहेत, याचा अधिकचा तपशील समोर आला नाही.
राणी ताराबाईंचा उदय
संभाजीराजे यांच्या पत्नी राणी येसूबाई आणि पुत्र शाहू मोगलांच्या नजरकैदेत होते. आझमशाह याने दिल्लीच्या वर असता शाहूंची सुटका केली. शाहूंच्या स्वराज्यातील आगमनामुळे राजकारणाला नवी कलाटणी मिळाली. शाहू मोगली छावणीत सोळासतरा वर्षे राहून आल्यामुळे त्यांना राज्यकारभाराचा अनुभव नव्हता. बाळाजी विश्वनाथ पेशव्याच्या प्रयत्नामुळे पातशाहीकडून त्यांना स्वराज्य, चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मिळाले असले. त्यांच्या पाठबळावर शाहू अहमदनगरमार्गे सातारला येत असता, भीमेकाठी खेड येथे (१७०७) ताराबाई त्यांच्या विरोधात उभी राहिल्या.
ताराबाईची सत्ता संपुष्टात येऊन छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या झाल्या. छत्रपती शाहू महाराज १७४९ मध्ये निपुत्रिक वारले. त्यांच्या पश्चात दत्तकपुत्र रामराजा (ताराबाईचा नातू) राज्यावर आले. बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे यांनी सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या दत्तकाच्या मार्गाने एक करण्याचा प्रयत्न करून केला. पण, या गोष्टीस खुद्द शाहू राजांनीच विरोध केला होता. संभाजींचे नाव पुढे येताच ताराबाईंनी आपल्या नातवास शाहूंच्या पत्नीच्या मांडीवर दत्तक दिले. त्यामुळे नानासाहेबाची योजना बारगळली. शाहूनंतर राज्य छत्रपतींचे, पण सत्ता पुण्याचे पेशवे व त्यांच्या मुत्सद्यांच्या हाती, अशी पेशवाईची अखेरपर्यंत स्थिती होती. रामराजासुद्धा निपुत्रिक होते त्यामुळे त्यांच्या जागी दुसरे शाहू हे दत्तक पुत्र गादीवर आले व त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र प्रतापसिंह छत्रपती बनले. प्रतापसिंह यांच्या काळात पेशवाईचा अंत झाला व ब्रिटीशांची सत्ता सुरु झाली.
कोल्हापूर आणि सातारा गादीचा इतिहास
पेशव दक्षिणेतील सरंजामदारांशी कोल्हापूर छत्रपतीचे सतत संघर्ष झाले; पण या संघर्षातून कोल्हापूरची गादी शाबूत राहिली. याचे श्रेय संभाजी आणि शिवाजी या दुसऱ्या व तिसऱ्या छत्रपतींना आहे. १८५७ च्या उठावाच्या प्रसंगी कोल्हापूर राज्य वाचले मात्र १८५७ च्या उठावाची ठिणगी कोल्हापूरात देखील पेटली होती. म्हणून कोल्हापूरच्या महाराजांची समाधी पाकिस्तानातल्या कराचीमध्ये आहे. या परंपरेतील सर्वाधिक थोर छत्रपती म्हणजे राजर्षी शाहू महाराज त्यांच्या कारकिर्दीत शैक्षणिक आणि सामाजिक बाबतींत कोल्हापूर संस्थानाने ज्या अनेक क्रांतिकारक सुधारणा केल्या. त्यामुळे भोसले घराण्याची प्रतिष्ठा खूप उंचावली.
शहाजी महाराजांच्या मृत्यू नंतर त्यांच्या दत्तक मुलाचा अधिकार ब्रिटीश सत्तेने नाकारला आणि सातारा संस्थान प्रांतात विलीन करण्यात आले. त्यानंतर उदयनराजे हे शिवाजी महाराजांच्या १३ व्या वंशजांचे म्हणजेच प्रतापसिंह भोसले यांचे पुत्र होय. तर शिवेंद्रराजे भोसले हे प्रतापसिंह यांचे बंधू अभयसिंह यांचे पुत्र आहेत. राजसबाई यांनी आपला मुलगा संभाजी यांना कोल्हापूरच्या गादीवर बसविले. मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद चर्चेत आला. संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर हल्लाबोल करत उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत असं म्हटलं होतं.
महाराजांच्या वंशजांचे आज राजकारणातील स्थान
माजी खासदार आणि भाजपा नेते उदयनराजे हे शिवाजी महाराजांच्या १३ व्या वंशजांचे म्हणजेच प्रतापसिंह भोसले यांचे पुत्र होय. तर शिवेंद्रराजे भोसले हे प्रतापसिंह यांचे बंधू अभयसिंह यांचे पुत्र आहेत. आत्ताचे राज्यसभा भाजपा खासदार संभाजीराजे भोसले हे कोल्हापूर गादीचे वारस आहेत. तसेच ते सध्या भाजपाचे राज्यसभा खासदार आहेत. उदयनराजे हे आपल्या विनोदी शौलीसाठी प्रसिद्ध आहेत, राष्टवादी काँग्रेसमध्ये ते खासदार होते, पण त्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांनतर लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सध्या महाराजांच्या दोन गाद्या आहेत, एक कोल्हापर आणि दुसरी सातारा. कोल्हापूरमध्ये खासदार संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, तर माजी खासदार आणि भाजपा नेते उदयनराजे हे शिवाजी महाराजांचे थेट १३ वे वंशज आहेत.