ठाणे : मशिदींवरील भोंगे काढण्यावरून सध्या मनसे आग्रही झालेली दिसत आहे. गुढीपाडवा आणि त्यांनतर ठाण्यात झालेल्या सभेत भोंगा, मशिद, हनुमान चालिसावर मनसेनं रोखठोक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभुमीवर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी स्वत च्या वाढदिवशी भोंग्याच्या आकाराचा केक कापून वाढदिवस साजरा केला.
नुकतीचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ठाण्यात सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंचा सत्कार करण्यात आला होता. त्यांना भगवी शाल देण्यात आली होती आणि नंतर लगेचच तलवारही देण्यात आली. भेट दिलेली तलवार राज ठाकरेंनी सभेला दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मनसे नेते अविाश जाधव यांनी प्रतिक्रीया दिली असून तलवार दाखवणे ही एक प्रकारची संस्कृती असल्याचं म्हणाले आहे.
[read_also content=”अंजनि-पुत्र पवनसुत नामा! आज हनुमान जयंती, ‘असं’ आहे हनुमान चालिसाचं महत्त्व, पठण केल्यास असा मिळतो लाभ https://www.navarashtra.com/lifestyle/hanuman-jayanti-200-read-importance-of-hanuman-chalisa-nrak-269569.html”]
जर राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल व्हायलाच हवा, तलवार दाखवणे ही एक प्रकारची संस्कृती आहे, त्यामुळे जर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
[read_also content=”मनसेकडून सामना कार्यालयाबाहेर बॅनरबाजी, संजय राऊत तुमचा कर्कश भोंगा बंद करा, नाहीतर मनसे स्टाईलनं उत्तर देऊ मनसेचा इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/mns-banner-waving-outside-the-match-office-sanjay-raut-turn-off-your-horn-269568.html”]