वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील देहू नगरपंचायतीच्या निवडणुकाच्या तोंडावर भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने भाजपला तसाच धक्का देत देहू, तळेगाव दाभाडे लोणावळा येथील भाजपचे विद्यमान नगरसेवक, भाजपचे शहराध्यक्षासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी आमदार सुनील शेळके यांचे नेतृत्व स्वीकारून मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि.२) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला.
यामध्ये भाजपचे समर्थक देहू गावाचे माजी उपसरपंच स्वप्नील काळोखेंसह लोणावळा नगरपरिषद विद्यमान नगरसेवक भरतभाऊ हारपुडे, काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आरोही तळेगावकर, भाजपचे माजी शहर उपाध्यक्ष गणेश, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक चंद्रभान खळदे, उद्योजक भरत काळोखे, अमोल काळोखे यांनी असंख्य समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, लोणावळा व देहू शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.






