• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Na Tax Of City Societies Abolished

मोठी बातमी ! शहरातील सोसायट्यांचे NA कर रद्द; राज्य सरकारने थकबाकीही केली माफ

प्रश्नोत्तराच्या तासात आमदार भीमराव तापकीर यांनी शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांसाठी अकृषिक कर माफ करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी हे स्पष्ट केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 05, 2026 | 09:32 AM
शहरातील सोसायट्यांचे NA कर रद्द

शहरातील सोसायट्यांचे NA कर रद्द (File Photo : Building)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : राज्यातील शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांवर आकारला जाणारा अकृषिक (एनए) कर रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापुढे जुन्या किंवा नव्या कोणत्याही बांधकामांवर हा कर आकारला जाणार नाही. तसेच पूर्वीची थकबाकीदेखील शासनाने माफ केली असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.

प्रश्नोत्तराच्या तासात आमदार भीमराव तापकीर यांनी शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांसाठी अकृषिक कर माफ करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी हे स्पष्ट केले. तापकीर यांनी शहरी भागातील बांधकामांवरील जागांवर अकृषिक कर आकारला जात होता. या नव्या प्रणालीमुळे नागरिकांना वारंवार महसूल कार्यालयात जावे लागणार नाही. तसेच करप्रणाली अधिक सुलभ होणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. या निर्णयामुळे गृहनिर्माण संस्थांवरील आर्थिक भार कमी होणार असून, शहरी भागातील हजारो फ्लॅटधारकांना दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांसाठी अकृषिक कराच्या प्रश्नावर पूर्णविराम मिळाला असून, नागरिकांना कर, दंड किंवा व्याजाचा कोणताही अतिरिक्त भार सहन करावा लागणार नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

थकबाकीदेखील सरकारने माफ केली

१० मार्च २०२६ रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार हा कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयापूर्वी झालेल्या बांधकामांवर आकारलेला कर रद्द केला जाणार का तसेच भविष्यात बांधकाम परवानगी देताना हा कर बांधकाम व्यावसायिकांकडून एकरकमी वसूल केला जाणार का, असे दोन प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मंत्री बावनकुळे उत्तरात म्हणाले की, राज्य सरकारने वार्षिक अकृषिक कर पूर्णपणे रद्द केला आहे. त्यामुळे जुनी किंवा नवी अशी कोणतीही बांधकामे असोत, त्यांच्यावर आता एनए कर आकारला जाणार नाही. यापूर्वी आकारलेला कर तसेच थकबाकी देखील शासनाने माफ केली आहे.

रुपांतरण करासंदर्भातही सुलभ पद्धत लागू

रूपांतरण करासंदर्भात शासनाने सुलभपद्धत लागू केली असल्याचेही सांगून, त्यानुसार २००१ पूर्वी झालेल्या बांधकामांसाठी २००१ च्या रेडी रेकनर दराच्या ०.१० टक्के इतका दर निश्चित करण्यात आला आहे. हा दर एक हजार चौरस मीटर क्षेत्रफळासाठी लागू राहील. याशिवाय मोठ्या क्षेत्रफळाच्या विकासासाठी एकरकमी रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चार हजार चौरस मीटरपर्यंतच्या क्षेत्रासाठी ०.२५ टक्के तर त्यापेक्षा जास्त म्हणजे एक एकराहून अधिक क्षेत्रासाठी ०.१५ टक्के इतका दर आकारून एकदाच रक्कम भरल्यास संबंधितांना पुढील करातून सूट मिळणार आहे.

हे देखील वाचा: राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जांना मुद्रांक शुल्क माफ

Web Title: Na tax of city societies abolished

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

“राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद…”; महसूलमंत्री Chandrshekhar Bawankule यांचे विधानसभेत उत्तर
1

“राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद…”; महसूलमंत्री Chandrshekhar Bawankule यांचे विधानसभेत उत्तर

“ऊर्जा क्षेत्राच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने…”; CM Devendra Fadnavis यांनी दिल्या सूचना
2

“ऊर्जा क्षेत्राच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने…”; CM Devendra Fadnavis यांनी दिल्या सूचना

Health News: महाराष्ट्रात आरोग्य मोहिमांना मिळतोय नागरिकांचा उत्साही प्रतिसाद
3

Health News: महाराष्ट्रात आरोग्य मोहिमांना मिळतोय नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेतून 15 हजार युवकांना…; आशिष शेलार यांनी व्यक्त केला विश्वास
4

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेतून 15 हजार युवकांना…; आशिष शेलार यांनी व्यक्त केला विश्वास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नूतन कार्यकारिणी जाहीर; कार्याध्यक्षपदी गणेश सोनवणे यांच्यासह अनेकांची निवड

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नूतन कार्यकारिणी जाहीर; कार्याध्यक्षपदी गणेश सोनवणे यांच्यासह अनेकांची निवड

Mar 05, 2026 | 11:01 AM
कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा ‘हे’ थंडगार मॉकटेल्स

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा ‘हे’ थंडगार मॉकटेल्स

Mar 05, 2026 | 10:56 AM
‘जना नायगन’च्या रिलीज डेटबद्दल विजयने सोडले मौन, थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन; म्हणाला ‘तुम्ही मला गप्प करू शकता पण…’

‘जना नायगन’च्या रिलीज डेटबद्दल विजयने सोडले मौन, थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन; म्हणाला ‘तुम्ही मला गप्प करू शकता पण…’

Mar 05, 2026 | 10:53 AM
Jharkhand Crime: संतापजनक! प्रियकरासह मित्रांनी आळीपाळीने केला अत्याचार, नंतर अल्पवयीन मुलीची केली हत्या

Jharkhand Crime: संतापजनक! प्रियकरासह मित्रांनी आळीपाळीने केला अत्याचार, नंतर अल्पवयीन मुलीची केली हत्या

Mar 05, 2026 | 10:51 AM
David Miller क्रिकेट इतिहासातील सर्वात अनलकी खेळाडू? आयसीसी स्पर्धेत 12 व्यांदा मिळाले अपयश

David Miller क्रिकेट इतिहासातील सर्वात अनलकी खेळाडू? आयसीसी स्पर्धेत 12 व्यांदा मिळाले अपयश

Mar 05, 2026 | 10:43 AM
Dinvishesh : भारत सरकारने केली राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना; जाणून घ्या 05 मार्चचा इतिहास

Dinvishesh : भारत सरकारने केली राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना; जाणून घ्या 05 मार्चचा इतिहास

Mar 05, 2026 | 10:41 AM
Hormuz Strait News: भारताचा सागरी संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय; एचएएल-रशियाचा ५,०८३ कोटींचा करार

Hormuz Strait News: भारताचा सागरी संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय; एचएएल-रशियाचा ५,०८३ कोटींचा करार

Mar 05, 2026 | 10:34 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.