Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election 2026: भाजप-शिंदेसेना की ठाकरे बंधू.., मुंबईकरांचा कल कुणाकडे? सर्वेतून धक्कादायक माहिती समोर

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर AsceIndia संस्थेने जाहीर केलेल्या सर्व्हेमध्ये विविध समाजगटांमधील मतदानाचा कल स्पष्ट झाला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 05, 2026 | 02:31 PM
Bmc Election

Bmc Election

Follow Us
Close
Follow Us:
  • मिनी विधानसभा निवडणुकांची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली  आहे
  • AsceIndia या संस्थेचा मुंबई महापालिका निवडणुकांसाठी एक सर्व्हे
  • मुंबई महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 55 टक्के
BMC Election 2026: राज्यातील मिनी विधानसभा निवडणुकांची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. आजपासून मुंबईत ठाकरे बंधुंच्या प्रचारसभांना सुरूवात होणार आहे.यंदाच्या महापालिका निवडणुका ठाकरे बंधुंसाठी अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. तर दुसरीकडे, यावेळी मुंबईत कोणत्याही परिस्थितीत भाजपचीच एकहाती सत्ता आणायची आणि भाजपचाच महापौर बसवायचा, असा निर्धार केला आहे. त्यामुळे निवडणुकांची चुरस वाढत चालली आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत मराठी मतदारांसोबच अमराठी मतदारांनाही आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. (Mumbai Election Result Survey 2026)

Mayor of Mumbai : कलमा पठण करणारी मुस्लिम महिलाच मुंबईची महापौर होणार…; AIMIM नेत्याचा दावा

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर AsceIndia या संस्थेने मुंबई महापालिका निवडणुकांसाठी एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार मुंबईतील जवळपास निम्मे मराठी मतदार ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, एकूण निकाल पाहता मुंबईत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचीच सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार अमराठी मतदार मोठ्या प्रमाणावर भाजप आणि शिंदे गटाला मतदान करतील, असा कयास आहे. AsceIndia चे संस्थापक अमिताभ तिवारी यांनी ठाकरे बंधूंना मुंबईत माफक यश मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे.

तिवारी यांच्या मते, 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 55 टक्के होती आणि यंदाही मतदान जवळपास याच टक्केवारीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व्हेनुसार मुंबईत भाजप-शिवसेनेचा महापौर बसण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांना किती जागा मिळतात आणि ते मुंबईत आपले अस्तित्व कितपत टिकवू शकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (BJP Politics)

“आईबाबा आणि साईबाबांच्या आशिर्वादाने…”, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संतोष जुवेकरने दिली Good News!

कोणाला किती मते मिळणार?

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर AsceIndia संस्थेने जाहीर केलेल्या सर्व्हेमध्ये विविध समाजगटांमधील मतदानाचा कल स्पष्ट झाला आहे. मराठी, मुस्लीम आणि अमराठी मतदारांच्या पसंतीनुसार पक्षांना मिळणाऱ्या टक्केवारीचा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.

मराठी मतदारांमध्ये ठाकरे गट–मनसे आघाडीला 44 टक्के मतं मिळण्याचा अंदाज असून भाजप–शिवसेना युतीला 42 टक्के मते मिळू शकतात. काँग्रेसला 4 टक्के, तर इतर पक्षांना 11 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

मुस्लीम मतदारांमध्ये काँग्रेस आघाडीवर असून तिला 41 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. ठाकरे गट–मनसेला 28 टक्के, भाजप–शिवसेनेला 11 टक्के, तर इतर पक्षांना 20 टक्के मते मिळू शकतात.

अमराठी मतदारांमध्ये भाजप–शिवसेना युतीला मोठा कौल मिळताना दिसत असून 53 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 19 टक्के, ठाकरे गट–मनसेला 15 टक्के आणि इतर पक्षांना 13 टक्के मते मिळू शकतात.

या आकडेवारीनुसार मराठी मतदारांमध्ये चुरशीची लढत असली तरी अमराठी मतदारांचा कौल भाजप–शिवसेनेच्या बाजूने अधिक झुकलेला असल्याचे चित्र समोर येत आहे.

 

 

 

 

Web Title: Bmc election 2026 bjpshinde sena or thackeray brothers survey reveals mumbai voters surprising mood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • BJP Politics
  • BMC Election 2026
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

जिंकण्यासाठी साम,दाम.दंड,भेद…! ठाकरेंच्या उमेदवाराला पोलीस घेऊन एकनाथ शिंदेंच्या घरी, Video आला समोर
1

जिंकण्यासाठी साम,दाम.दंड,भेद…! ठाकरेंच्या उमेदवाराला पोलीस घेऊन एकनाथ शिंदेंच्या घरी, Video आला समोर

Maharashtra Elections 2026 : देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! “पराभव समोर दिसत असल्याने…”, भाजप नेत्याकडून संताप व्यक्त
2

Maharashtra Elections 2026 : देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! “पराभव समोर दिसत असल्याने…”, भाजप नेत्याकडून संताप व्यक्त

BMC Election 2026: शिंदे-भाजपसाठी RSS,स्टार प्रचारक मैदानात; उत्तर भारतीयांसाठी भाजपचा मेगा प्लॅनिंग
3

BMC Election 2026: शिंदे-भाजपसाठी RSS,स्टार प्रचारक मैदानात; उत्तर भारतीयांसाठी भाजपचा मेगा प्लॅनिंग

कळंबोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये युतीची प्रचारात आघाडी, सरस्वती काथारांसह इतर उमेदवारांना वाढता पाठिंबा
4

कळंबोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये युतीची प्रचारात आघाडी, सरस्वती काथारांसह इतर उमेदवारांना वाढता पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.