Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking: क्रिकेटविश्वात खळबळ! ‘या’ खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती, आशिया कपआधी…

Breaking: आशिया कप स्पर्धेच्या आधी पाकिस्तान क्रिकेट संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महिला संघातील वेगवान गोलंदाज असलेल्या  ऐमन अनवरने निवृत्ती घेतली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 26, 2026 | 02:52 PM
pakistan cricket board

pakistan cricket board

Follow Us
Follow Us:
  • लवकरच सुरू होणार आशिया कप 2026 स्पर्धा 
  • पाकिस्तान संघाला बसला मोठा फटका 
  • ऐमन अनवरने अचानक जाहीर केली निवृत्ती
Pakistan Cricket Board/Breaking News:  यावर्षी जपानमध्ये आशियाई खेळ आयोजित केले जात आहेत. आशियाई खेळांमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे. आशियाई खेळांचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. त्याआधीच पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

आशिया कप स्पर्धेच्या आधी पाकिस्तान क्रिकेट संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महिला संघातील वेगवान गोलंदाज असलेल्या  ऐमन अनवरने निवृत्ती घेतली आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमधून तिने निवृत्ती जाहीर केली आहे. तिने याबाबतची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डला दिली आहे. तिने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र तिने पूर्णपणे क्रिकेटशी आपले नाते तोडले नसल्याचे समोर येत आहे.

Cricket News: वनडे क्रिकेटचा महासंग्राम! इंग्लंड, पाकिस्तान अन् श्रीलंका भिडणार; ट्राय-सिरीजचे पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

ऐमन अनवर

पाकिस्तानची वेगवान गोलंदाज ऐमन अनवरने 32 व्या वर्षी इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर अनवर अंपायर आणि ब्रॉडकास्टर म्हणून आपली नवीन कारकीर्द सुरू करणार आहे. नुकतीच टीमने पाकिस्तानच्या राष्ट्रीय महिला यू 19 स्पर्धेत मॅच रेफ्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

ऐमन अनवरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

ऐमन अनवरne 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध टी 20 आणि 2017 मध्ये बांग्लादेशविरुद्ध वंडे क्रिकेटमध्ये डेब्यू केले होते. तसेच तिने पाकिस्तानकडून खेळताना 8 वनडे सामने आणि 37 टी 20 सामने खेळले आहेत. तसेच तिने 2018, 2020 आणि 2023 च्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकपमध्ये व 2022 मध्ये वनडे वर्ल्डकपमध्ये सहभाग घेतला होता.

गेलेली अब्रू वाचली, पण…! Pakistan ची १४ व्या क्रमांकावरील नेदरलँड्सवर कशीबशी मात, स्पर्धेचा शेवट गोड

क्रिकेटच्या मैदानावरील खेळाडू म्हणून निवृत्ती घेतलेल्या ऐमन अनवरने फेब्रुवारी 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आपला शेवटचा टी 20 सामना खेळला होता.  निवृत्तीच्या घोषणेपूर्वी काही काळ ती क्रिकेट सामन्यांमध्ये ब्रॉडकास्टर (कमेंटेटर/विश्लेषक) म्हणून कार्यरत होती. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात तिने पीसीबीचा ‘क्रिकेट रेफरी इंडक्शन कोर्स’ यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. एकीकडे ऐमनने रेफरी म्हणून नवीन अध्याय सुरू केला आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानचा महिला संघ आगामी ACC वूमेन्स आशिया चषक स्पर्धेसाठी सज्ज होत आहे. या हाय-व्होल्टेज स्पर्धेत ५ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात थरारक सामना रंगणार असून सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या महामुकाबल्याकडे लागले आहे.

Web Title: Breaking news aimen anwar take retirement pakistan cricket board before asia cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Breaking News
  • Pakistan cricket
  • PCB
  • Retirement

संबंधित बातम्या

Cricket News: इंग्लंडच्या ‘या’ स्टार खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय; १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम
1

Cricket News: इंग्लंडच्या ‘या’ स्टार खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय; १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम

PAK Vs ENG: नसलेली लाज घालवली! इंग्लंडने पाकला थेट १ डाव अन् १०३ रन्सने हरवलं
2

PAK Vs ENG: नसलेली लाज घालवली! इंग्लंडने पाकला थेट १ डाव अन् १०३ रन्सने हरवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.