पाकिस्तानचा नेदरलँड्सवर विजय (फोटो- सोशल मीडिया)
महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये शनिवारी एक अतिशय रंजक आणि विचित्र सामन्याची नोंद झाली. पाकिस्तानने आज आपला शेवटचा साखळी सामना खेळला. शेवटच्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने नवख्या नेदरलँड्सचा पराभव केला आहे. नेदरलँड्सचा 37 रन्सने पराभव झाला आहे. दोन्ही संघांचे वर्ल्डकपमधील आव्हान संपले आहे.
पाकिस्तानने याधीचे सर्व साखळी सामने गमावले आहेत. पाकिस्तानच्या संघासाठी वर्ल्डकप स्पर्धा अत्यंत खडतर अशी ठरली. एकाही सामन्यात विजय न मिळवलेल्या पाकिस्तानच्या संघाने नेदरलँड्सचा 37 रन्सने पराभव केला आहे. पाकिस्तानने नवख्या आणि आयसीसी रँकिंगमध्ये १४ व्या स्थानावर असलेल्या नेदरलँड्सचा पराभव केला आहे.
पाकिस्तानच्या कर्णधाराने फातीमा सनाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. पाकिस्तानने सुरुवात चांगली केली. सलामीची फलंदाज गुल फिरोजाने 52 बॉलमध्ये 63 रन्सची खेळी केली. तसेच आयेशा जफरने 32 रन्स केल्या. दोन्ही फलंदाजांनी 79 रन्सची पार्टनरशिप करत पाकिस्तानला चांगली आघाडी मिळवून दिली. मात्र बाकीचे फलंदाज अपयशी ठरले. नेदरलँड्सचे पाकिस्तानला 20 ओव्हर्समध्ये 126 रन्सवर रोखले.
गरीबी मे आटा गिला! Pakistan चा पार कचरा; टीम इंडियाचे दोन विजय अन्…, सध्या स्थिती काय?
127 रन्सचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा डाव 89 रन्सवर ऑल आउट झाला. नेदरलँड्सची कर्णधार बाबेट लीडेने 30 तर हेदरने 24 रन्स केल्या. बाकीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत. या डावातील सर्वात अजब गोष्ट म्हणजे नेदरलँड्सच्या तब्बल ५ फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. आज पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा शेवटचा सामना होता. वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ पूर्णपणे अपयशी ठरला आहे. मात्र शेवटच्या सामन्यात त्यांनी विजय मिळवून आपल्या महिमेचा शेवट गोड केला आहे. भारतीय संघाने पाकिस्तानचा पहिला पराभव केला होता.
नेदरलँड्स: स्टेरे कॅलिस, सान्या खुराना, फोबी मोल्केनबोअर, बाबेट डी लीडे (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रॉबिन रिजके, आयरिस झविलिंग, हीदर सीगर्स, फ्रेडरिक ओव्हरडाईक, कॅरोलिन डी लँग, सिल्व्हर सीगर्स, इसाबेल वॉन.
भारत – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), श्री चरानी, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नंदनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव.






