नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आणि नुकताच सीबीआयच्या (CBI) प्रमुखपदाचा कार्यभार सांभाळलेले सुबोध कुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांनी सीबीआय कार्यालयात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता CBI चे अधिकारी आता कामावर असताना जीन्स, टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शूज घालू शकणार नाहीत. सुबोध जयस्वाल यांनी कार्यभार हाती घेताच CBI अधिकाऱ्यांसाठी ड्रेस कोड ठरवला आहे. त्यानुसार आता CBI मधील अधिकारी आणि कर्मचारी फॉर्मल कपड्यांमध्येच पाहायला मिळतील.
CBI चे संचालक सुबोध जयस्वाल यांच्या आदेशानुसार सहाय्यक संचालक (प्रशासन) अनूप टी मॅथ्यू यांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यानुसार CBI कार्यालयात आता जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज किंवा चप्पल घालून येता येणार नाही. पुरुष अधिकाऱ्यांना कार्यालयात फॉर्मल शर्ट-पॅन्ट आणि फॉर्मल शूज घालूनच यावं लागणार आहे. त्याचबरोबर योग्य पद्धतीने दाढी / शेविंग करावं लागणार आहे. तर महिला अधिकाऱ्यांनी फक्त साडी, सूट आणि फॉर्मल शर्ट घालूनच कार्यालयात येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, सीबीआय अधिकाऱ्यांकडून जयस्वाल यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. तसंच यापुढेही अनेक महत्वाचे बदल होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
[read_also content=”मलेशियात थैमान ; पुन्हा देशव्यापी लॉकडाऊन लागू; फक्त आणि फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार https://www.navarashtra.com/latest-news/malaysia-enters-nationwide-total-lockdown-third-times-as-covid-19-infections-wave-nrvb-137857.html”]
सुबोध कुमार यांची सीबीआयच्या प्रमुखपदी २६ मे रोजी निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या बैठकीनंतर जयस्वाल यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. अखेर सीबीआय संचालकपदी त्यांचीच नियुक्ती करण्यात आली. १९८५ च्या बॅचमधील जयस्वाल यांची २ वर्षांसाठी सीबीआयच्या प्रमुखपदी नियुक्ती झालीय. पदभार स्वीकारल्यापासून ही २ वर्षांची मुदत असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी सीबीआय संचालकाच्या स्पर्धेतील २ नावांवर फुली मारली आहे. त्यामुळे या पदावर जयस्वाल यांची वर्णी लागण्याची शक्यता आधीच वर्तवली जात होती.
[read_also content=”केंद्र सरकार आणतंय नवा नियम; इलेक्ट्रिक कार आणि बाईक खरेदी करणं होणार सुलभ https://www.navarashtra.com/automobile/central-government-bringing-new-rules-india-will-be-easy-to-buying-electric-cars-and-bikes-nrvb-137820.html”]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासोबत बैठक घेतली होती. सीबीआयच्या संचालक निवडीसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. तब्बल ९० मिनिटे ही बैठक चालली. यावेळी रमन्ना यांनी एका महत्त्वाच्या नियमाचा हवाला देऊन या स्पर्धेतील दोन नावांवर फुली मारली होती.
cbi director subodhkumar jaiswal order officers have to wear formal attire at cbi office