नागपूर (Nagpur). कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावावर (corona) नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून करण्यात येत असलेल्या संयुक्त प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम (The joint efforts of the district administration and the health department) दिसू लागला आहे. नागपूर जिल्ह्यात मंगळवारी शहरी आणि ग्रामीण भागात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या जवळपास सारखीच असल्याचे नोंदविण्यात आले.
[read_also content=”आष्टी शहिद/ नैसर्गिक आपत्ती बचाव पथकाची रंगीत तालीम; पोलिस विभाग, वनविभागासह वैद्यकीय पथकाचा समावेश https://www.navarashtra.com/latest-news/colorful-training-of-natural-disaster-rescue-squads-involvement-of-medical-team-including-police-department-forest-department-nrat-133944.html”]
प्रशासनाकडून (from the administration) मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज २५ मे रोजी जिल्ह्यात ४७० नवीन कोरोना रुग्ण (new corona patients have been detected) आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील (corona patients in urban areas) २१३, ग्रामीण भागातील (in rural areas) २४६ आणि जिल्ह्याबाहेरील ११ कोरोना रुग्णांचा समावेश आहे.
नागपूर जिल्ह्यात आज मंगळवारी कोरोनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील ४, ग्रामीण भागातील १० आणि जिल्ह्याबाहेरील ११ कोरोना रुग्णांचा समावेश असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून आज १४१४५ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये शहरातील ८४६५ रुग्ण आणि ग्रामीण भागातील ५६८० रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या १९८१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
कोरोना संक्रमितांची एकूण संख्या ४.७२ लाखांवर पोहोचली आहे. सध्या एकूण कोरोना Active रुग्णांची संख्या १०,८४८ नोंदविण्यात आली आहे. यामध्ये शहरातील ५८३७ रुग्ण आणि ग्रामीण भागातील ५०११ रुग्ण आहेत. कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतलेल्या एकूण रुग्णांची संख्या ४.५२ लाखांवर पोहोचली आहे. तर एकूण मृत्यूसंख्या ८८२२ इतकी असल्याचे मंगळवारी नोंदविण्यात आले.