नागपूर (Nagpur). कोरोनाच्या प्रादूर्भावाला आटोेक्यात आणण्यासाठी जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाकडून (health administration) कठोर उपाययोजना केल्या जात आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या (number of corona positive patients) आणि मृत्यूची आकडेवारी (number of deaths) सातत्याने घटत आहे. आरोग्य विभागकडून बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नागपूर शहरात 2532 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण मिळाले (2532 corona positive patients have been found in Nagpur city) आहेत. यामध्ये शहरातील 1319, ग्रामीण भागातील 1200 आणि जिल्ह्याबाहेरील 13 रुग्णांचा समावेश आहे.
[read_also content=”लाॅकडाउनचा आंब्याच्या दरांवर परिणाम; मूल्य घसरल्याने उत्पादकांची चिंता वाढली https://www.navarashtra.com/latest-news/impact-of-lockdown-on-mango-prices-the-fall-in-prices-has-raised-concerns-among-growers-nrat-128011.html”]
प्राप्त अहवालानुसार, नागपूर जिल्ह्यात मंगळवारी 65 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील 32, ग्रामीण भागातील 19 आणि जिल्ह्याबाहेरील 14 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून आज 14 हजार 464 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये शहरातील 9768 आणि ग्रामीण भागातील 4696 व्यक्तींचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या 6725 रुग्णांना मनपाच्या आरोग्य विभागाकडून सुटी देण्यात आली.
सध्या नागपूर जिल्ह्यात 4.53 लाख कोरोनाा संक्रमित रुग्ण आहेत. एकूण कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 46 हजार 596 आहे. यामध्ये शहरातील 23 हजार 467 आणि गा्रमीण भागातील 23 हजार 129 रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्य झालेल्यांची मंगळवारपर्यंतची आकडेवारी 8258 इतकी नोंदविण्यात आली आहे.