नागपूर : पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग (Honey Singh) हा अश्लील गाण्यांचे गायन करून ते युट्यूबवर अपलोड करतो याबद्दल व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनी सिंगविरुद्ध पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पाचपावली पोलिस ठाण्यामध्ये त्याला हजर (Attend the police station) राहण्याचे आदेश सत्र न्यायालयाने (Sessions Court) दिले आहे. बुधवारी या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश एस. ए. एस. एम. अली यांच्यासमक्ष झाली.