बांगलादेश हादरले! हिंदू विधवेवर अत्याचार करून झाडाला बांधले (Photo Credit - X)
जमीन व्यवहारातून सुरू झाला छळ
पीडित महिला बांगलादेशाच्या झेनाइदाह जिल्ह्यातील कालीगंज उपजिल्हा येथील रहिवासी आहे. अडीच वर्षांपूर्वी तिने स्थानिक रहिवासी शाहीन आणि त्याच्या भावाकडून २० लाख रुपयांना घर आणि जमीन खरेदी केली होती. या व्यवहारानंतर आरोपी शाहीन हा तिच्यावर वाईट हेतू ठेवून होता. तो वारंवार तिच्याशी अश्लील वर्तन करत असे.
#BREAKING: Minority Hindu Woman raped, tortured in Bangladesh. Attacks against Hindus continue under Pro-Islamist Yunus Govt. Two locals raped a 40-year-old Hindu widow in Kaliganj, Jhenaidah l, tied her to a tree, cut off her hair & subjected her to brutal torture on Saturday. pic.twitter.com/u2wj9vOJK0 — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) January 5, 2026
घरात घुसून अत्याचार आणि विटंबना
शनिवारी संध्याकाळी शाहीन आणि त्याच्या एका साथीदाराने पीडितेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यांनी महिलेवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिला घराबाहेर ओढत नेऊन एका झाडाला बांधले. आरोपींनी पीडितेचे केस कापले आणि तिची मोठी विटंबना केली. या क्रूर कृत्याचे त्यांनी मोबाईलवर चित्रीकरण केले आणि तो व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल केला.
धमकी आणि पोलिसात तक्रार
बलात्कारानंतर आरोपींनी पीडितेला तोंड बंद ठेवण्याची धमकी दिली होती. मात्र, पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी अधिकच संतापले आणि त्यांनी तिला झाडाला बांधून मारहाण केली. महिला बेशुद्ध पडल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. स्थानिकांनी जखमी अवस्थेत पीडितेला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी कालीगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, झेनाईदहचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बिलाल हुसेन यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
हिंदूंच्या हत्यांचे सत्र सुरूच
बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी दीपू दास, अमृत मंडल, बजेंद्र बिस्वास आणि खोकॉन दास या चार हिंदूंची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. खोकॉन दास या व्यापाऱ्याला तर जमावाने अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले होते. या घटनांमुळे बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायामध्ये दहशतीचे वातावरण असून आंतरराष्ट्रीय स्तरावर या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा निषेध केला जात आहे.






