रणपती शिवराय चित्रपटातून चिन्मय मांडलेकरची एक्झिट!
रणपती शिवराय चित्रपटात शिवछत्रपतींच्या भूमिकेत कोण झळकणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या रूपात अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र दिसणार आहे. तसेच त्याला पाहून त्याचे चाहते देखील खूप खुश झाले. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 30 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
चिन्मय आणि त्यांच्या कुटूंबाला ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. याचे कारण म्हणजे आपल्या मुलाचे ‘जहांगीर’ असे नाव ठेवल्यामुळे त्याच्या कुटुंबावरकाही युजर्सकडून टीका करण्यात आली. अनेकांनी मुघल सम्राटाच्या नावावरून मुलाचे नामकरण केल्याबद्दल चिन्मयवर निशाणा साधला.
सुपारी फुटली! अभिनेत्री गायत्री दातार लवकरच अडकणार लग्नबंधनात, खास व्हिडिओ केला शेअर
यानंतर चिन्मयची पत्नी नेहा जोशी यांनी या नावामागील कारण स्पष्ट केले. नेहाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत भूमिका मांडली. या व्हिडीओमध्ये नेहाने सांगितले की, त्यांच्या मुलाचे नाव जहांगीर’ ठेवण्यामागचा अर्थ जग जिंकणारा’ असा आहे. याशिवाय तिने प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे उदाहरणही दिले.
दरम्यान, अभिनेता चिन्मय मांडलेकरने यांनीही एक व्हिडीओ शेअर करत ट्रोलिंगवर नाराजी व्यक्त केली. मुलाच्या नावावरून आपल्या संपूर्ण कुटुंबाला लक्ष्य केले जात असल्याचे त्याने सांगितले. तसेच आपल्या श्रद्धा आणि भक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. या सर्व घडामोडींनंतर चिन्मयने मोठा निर्णय घेतला. ज्यात त्याने येणाऱ्या सिक्वेल्समध्ये शिवाजी महाराजांची भूमिका आपण पुढे साकारणार नाही, असे जाहीर केले आहे.






