पुष्पा :द राइज (Pushpa The Rise) हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) लूकची खूप चर्चा झाली. त्याच्या संवादांवर, डान्स स्टाईलवरही चाहते फिदा झाले. या चित्रपटाच्या गाण्यांनीही लोकांच्या मनावर अधिराज्य केलं. हा पुष्पा फिवर अद्याप संपलेला दिसत नाही. पुष्पा स्टाईल गणपती मूर्तींची (Pushpa Style Ganpati) क्रेझ यंदाच्या गणेशोत्सवात (Ganeshotsav 2022) बघायला मिळत आहे.
[read_also content=”अभिजीत आणि प्रियानं घेतलं टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन https://www.navarashtra.com/photos/abhijeet-khandkekar-and-priya-marathi-titwala-ganpati-visit-nrsr-320919.html”]
गणेशोत्सवाचा सण लोक आनंदाने साजरा करतात. ढोल ताशांच्या गजरात गणपतीचं स्वागत केलं जातं. गणपतीची मूर्ती घरी आणण्यासाठी भक्त खूप उत्सुक असतात. अशातच पुष्पा स्टाईल बाप्पाच्या मूर्तीची क्रेझ बघायला मिळत आहे. अभिनेता अल्लू अर्जुनचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन इतके दिवस झाले मात्र पुष्पाची आणि अल्लू अर्जुनच्या स्टाईलची क्रेझ मात्र गेली नाही, असंच म्हणावं लागेल.