बंगळुरू: प्रो कबड्डी लीग सीझन 8 च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दबंग दिल्ली केसीने बुधवारी बंगळुरू बुल्सचा ४०-३५ असा पराभव केला. पवन सेहरावतने या सामन्यात सर्वाधिक १५ रेड पॉईंट्स केले, तर नवीन कुमारने ११ गुण मिळवत दिल्लीला अंतिम फेरीत नेले. या विजयासह दबंग दिल्लीने अंतिम फेरीत प्रवेश केला असून, तेथे त्यांचा सामना तीन वेळा विजेत्या पाटणा पायरेट्सशी होणार आहे. सीझन ७ मध्ये देखील, दिल्लीने अंतिम फेरीत प्रवेश केला, जिथे त्यांना बंगाल वॉरियर्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यात बुल्सने धमाकेदार सुरुवात केली परंतु, लवकरच दिल्लीने पुनरागमन केले आणि एकदा आघाडी घेतल्यावर मागे वळून पाहिले नाही. या सामन्यात सौरभ नंदलला ४ टॅकल पॉइंट मिळाले, तर महेंद्रसिंगने तीन खेळाडूंना मॅटमधून बाहेर काढले. पवन सेहरावतने या सामन्यात सर्वाधिक १५ रेड पॉईंट्स केले, तर नवीन कुमारने ११ गुण मिळवत दिल्लीला अंतिम फेरीत नेले.