वडूज : हायहोल्टेज ठरलेल्या व दोन्ही उमेदवारांनी ही निवडणूक (Satara District Bank Election) प्रतिष्ठेची केल्याने खटाव तालुक्यातील राजकीय वातावरण तापले होते. हुतात्मा हायस्कूल येथील मतदान केंद्रावर सकाळी दहा वाजेपर्यंत दीडशेपैकी 31 मतदान पार पडले.
वडूज येथील मतदान केंद्रावर नंदकुमार मोरे यांचे मतदार दक्षिणेकडून तर प्रभाकर घार्गे यांचे मतदार उत्तरेकडून आल्यानेच पोलिस प्रशासनाचा ताण कमी झाला. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, रणजितसिंह देशमुख, संजीव साळुंखे, पंतप्रतिनिधी गायत्री देवी, सुरेंद्र गुदगे, प्रा. अर्जुन खाडे, प्रा. बंडा गोडसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खटाव तालुक्यातील दीडशे मतदारांपैकी १०३ मतदान सोसायटी मतदारसंघात असून, दुपारी एक वाजेपर्यंत ९३ मतदान झाले.
मतदारांचा लोंढा…
सकाळी दहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. तर अकरा वाजल्यानंतर अचानक मतदारांची गर्दी झाली. हा मतदारांचा लोंढा नेमका कोणाचा ही चर्चा मतदान केंद्राबाहेर सुरू होती.