फोटो सौजन्य - Social Media
बिग बॉस मराठीच्या घरात दररोज नवनवीन वळणे पाहायला मिळत आहेत. कालपर्यंत काटाच्या बरोबर असणारी राखी आज विशालच्या टोळीच्या बरोबर जास्त दिसून येते. आज अनेक प्रोमो शेअर करण्यात आले आहेत त्यातील एका प्रोमोमध्ये राखीने चक्क स्वतःची केस कापून टाकले आहेत आणि तिने स्वतःला दिलेल्या या शिक्षेमध्ये घरातले वातावरण बिघडल्याचे दिसून आले अशामध्ये या बिघडलेल्या वातावरणाला सावरण्यासाठी विशालने एक खेळ रचल्याचे चित्र दुसऱ्या प्रोमोमध्ये दिसून येत आहे.
या प्रोमोमध्ये विशाल राखीच्या केसांची बोली लावताना दिसून येत आहे आणि घरातील इतर सदस्य त्या केसांच्या तुकड्यावर बोली लावत आहे. बोलीची सुरुवात सागर पडून होते तो राखीच्या केसांच्या तुकड्यासाठी एक रुपये ५० पैशांची बोली लावता तर पुढे प्रभू त्याच केसांसाठी दोन रुपयांची बोली लावतो. पुढे दीपाली त्या केसांसाठी १०० रुपयांची बोली लावते पण खेळ इथेच थांबत नाही. सुरांची राणी प्राजक्ता त्या केसांसाठी १० हजारांची बोली लावते. नंतर अनुश्री चक्क दहा लाख एकशे एक रुपयांची बोली लावते, ते पाहून राखी सावंत उठते आणि अनुश्रीची पप्पी घेते. तेव्हाच राकेश ७ कोटी रुपयांची बोली लावतो. हे पाहून राखी आनंदी होते, ती राकेशच्या जवळ येत असता राकेश म्हणतो की ही बोली अनुश्रीने लावलेल्या रकमेसाठी आहे.
असा मस्तीचा खेळ बिग बॉसच्या घरात सुरु असतो. बिग बॉसने हा प्रोमो शेअर केला असून त्याखाली “राखीच्या केसांची लागली बोली… असा कॅप्शन दिला आहे. कमेंट्समध्ये बिग बॉसच्या प्रेक्षकांनीही मज्जा लुटली आहे. दरम्यान, त्याच भागात आधी राखीने उदासीत येऊन स्वतःला शिक्षा म्हणून स्वतःचे केस कापली होती. आता पुढे काय काय खेळ रंगणार? यासाठी आपल्याला बिग बॉस मराठीचे आगामी भाग पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






