न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) आणि त्याची गर्लफ्रेंड सारा रहीम यांची लव्ह स्टोरी इंटरेस्टींग आहे.
क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी व नेतृत्व कौशल्यानं तगड्या प्रतिस्पर्धींची बोलती बंद करणारा केन हा त्याच्या शांत स्वभावामुळेही ओळखला जातो.
लाजाळू स्वभावाचा असलेल्या केनची गर्लफ्रेंड सारा रहीमही (Sarah Raheem) त्याच्याप्रमाणेच प्रसिद्धीपासून लांब राहते.
केन आणि सारा हे मागच्यावर्षीच एका गोंडस मुलीचे आई-बाबा झाले आहेत. ब्रिस्टलमध्ये जन्मलेली सारा ही नर्स आहे आणि या दोघांनी अजूनपर्यंत लग्न केलेलं नाही, मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात ही दोघं आई-वडील झाले. त्यांच्या घरी नन्ही परी आली.
केन आणि सारा यांची पहिली भेट न्यूझीलंडच्या एका रुग्णालयात झाली, जिकडे केन उपचारासाठी गेला होता. केनवर उपचार सुरू असताना दोघांनी एकमेकांना त्यांचे फोन नंबर दिले. फोनवर काही काळ संभाषण झाल्यानंतर दोघं एकमेकांना डेटही करायला लागले.
during treatment kane williamson fell love nurse know about his love life






