ठाणे : जेवणाच्या कारणावरून सासू सुनेमध्ये भांडण झाल्याच्या बातम्या आपण नेहमी ऐकतो. मात्र वेळेवर जेवण न दिल्याने एका सासऱ्याने आपल्या सुनेला गोळी मारल्याने खळबळजनक घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणात राबोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सासरा फरार झाला आहे. तर, गंभीर जखमी झालेल्या सुनेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
[read_also content=”आलिया-रणबीरचे उत्साही चाहते; लावलं बंगाली पद्धतीने लग्न, फोटो होतायत व्हायरल https://www.navarashtra.com/movies/fans-celebrated-alia-and-ranbirs-bengali-wedding-pics-viral-nrak-269313.html”]
ठाण्यातील राबोड़ी परिसरात राहणारे काशीनाथ पाटील (76) हे रेती व्यवसायिक आहेत. काशीनाथ पाटील आणि त्यांची मोठी सून सीमा पाटील (42) यांच्यात गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास वेळेत नाश्ता दिला नाही, या कारणावरून किरकोळ वाद झाला. याचा राग आल्याने काशीनाथ पाटीलने आपल्या पिस्तुलातून सुनेवर गोळीबार केला. या घटनेत सीमा गंभीर जखमी झाल्या. त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. ज्या पिस्तूलातून गोळी झाडण्यात आली तिचा रितसर परवाना आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी घाटेकर यांनी दिली. या प्रकरणी राबोडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. काशीनाथ पाटील सध्या फरार असून राबोड़ी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
[read_also content=”चक्क मृत व्यक्तीला मिळाले घरकुल, नवेगावबांध ग्रामपंचायतीतील प्रकार, प्रकरण उघडकीस येताच केले हात वर https://www.navarashtra.com/maharashtra/the-deceased-was-found-dead-at-gharkool-navegaonbandh-gram-panchayat-nraa-269317.html”]