मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा (फोटो - istockphoto)
राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ
मुंबई शहरात उष्णतेच्या लाटेची शक्यता
हवामान विभागाने दिला इशारा
Heat Wave In Maharashtra: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये हवामानात बदल पाहायला मिळत आहे. तापमानात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. राज्यात उन्हाळा वाढला आहे. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे, तर मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईत देखील उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाने काय इशारा दिला आहे ते जाणून घेऊयात.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते. मुंबईला हवामान विभागाने यासंदर्भात अलर्ट जारी केला असल्याचे म्हटले जात आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी तापमान वाढले आहे. नागरिकांना दुपारी बाहेर पडले अशक्य होत आहे. अंगाची काहिली होत आहे.
India Weather: लई अवघड रे गड्या! छत्री, रेनकोट सोडा अन्…; देशात यंदा उष्णतेचा कहर असणार
राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राजधानी मुंबईत उष्णतेची लाट येऊ शकते. उष्णतेची लाट पुढे काही दिवस कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर जाताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे. मालेगाव शहर परिसरात मार्चच्या प्रारंभीच उन्हाची काहीली वाढली आहे. तापमानाचा पारा ३७.४ अंश सेल्सिअसवर नोंदवला जात आहे. दुपारच्या सत्रात रस्त्यांवरची वर्दळ ही कमी झाली आहे.
Heat Wave: उष्णतेचा हाहा:कार; महाराष्ट्र ‘या’ भागात भयानक उन्हाळा, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
उष्णतेचा हाहा:कार
विदर्भासह बिहार, झारखंड व छत्तीसगड या भागावर सध्या कमी दाबाचा द्रोणीय पट्टा सक्रिय असून पश्चिम हिमालयावर पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव दिसून येत आहे. या हवामान स्थितीमुळे विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या विदर्भातील कमाल तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असून किमान तापमान १९ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. भारतीय हवामाना विभागाच्या अंदाजानुसार बुधवारी अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात सातत्याने बदल दिसून येत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान वाढले आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात देखील उन्हाळा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पुणे शहरात देखील उष्णतेच्या झळ जाणवू लागली आहे.






