US Iran Tension : ट्रम्प यांची उडाली झोप! खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचे स्लीपर सेल सक्रिय? अमेरिकेत हाय अर्लट जारी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
एबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, खामेनेईंच्या निधनानंतर जगभरातील इराणचे स्लीपर सेल्स सक्रिय झाले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांना काही विशिष्ट ट्रान्समिशन्स सिग्नल्स मिळाले आहेत. हे सिग्नल इराणमधून पाठवण्यातच आले असल्याचे म्हटले जात आहे. हे सिग्नल्स अत्यंत गुप्त स्वरुपात असून तज्ज्ञांच्या मते हे जगभरात विखुरलेल्या इराणच्या स्लीपर एजंट्सला दिलेला एक ऑपरेशनल ट्रीगर असण्याची शक्यता आहे. हे गट कोणत्याही क्षण घातपाती हल्ले किंवा कारवाया करु शकतात.
अमेरिकन गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संदेश पाठवण्यासाठी रेडिओ-फ्रिक्वेन्सी आणि सीक्रेट रिसीव्हर्सचा वापर करण्यात आला आहे. ज्या एजंट्सकडे याचे डिकोडिंग तंत्र आहे त्यानांच हा मेसेज समजू शकते. या गुढ मेसेजमुळे अमेरिकेच्या फेडरल सरकारने सर्व लॉ एनफोर्समेंट एजन्सींना ‘हाय अलर्ट’वर राहण्याचे आदेश दिले आहेत. सध्या कोणत्याही विशिष्ट ठिकाणावर हल्ल्याची माहिती मिळाली नाही. पण संशयास्पद हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.
हे संकट अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण तीव्र पेटला आहे. इस्रायलनेही लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत. तसेच इराणच्या तेल डेपोनांही उद्ध्वस्त करण्यात आले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराणही इस्रायलह मध्यपूर्वेतील आखाती देशांत अमेरिकन लष्करी तळांवर शेकडो मिसाइल्स डागली आहेत. या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन संकट निर्माण झाले आहे.






