चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँग यांचा 2012 मध्ये मृत्यू झाला होता (फोटो - टीम नवराष्ट्र)
मानवाने पृथ्वीच्या कक्षा ओलांडत अवकाशामध्ये झेप घेतली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करत पृथ्वी सोडून अंतराळामध्ये प्रवेश करुन नवनवीन संशोधन सुरु आहेत.मानव अगदी चंद्रावर देखील पोहचला आहे. पृथ्वीवरुन स्वप्नामध्ये गवसणी घालणाऱ्या चंद्रावर मानवी जातीतील पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्राँग हे पहिले व्यक्ती ठरले आहे. 1969 मध्ये नील आर्मस्ट्राँग यांनी आजच्या दिवशी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. नील आर्मस्ट्राँग हे एक अमेरिकन अंतराळवीर आणि वैमानिक अभियंता होते, जे १९६९ च्या अपोलो ११ मोहिमेचे कमांडर म्हणून चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती ठरले. आजच्या दिवशी 2012 रोजी नील आर्मस्ट्राँग यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांचे नाव हे कायम जनमनामध्ये कोरले गेले आहे.
25 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
25 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
25 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष
1270 : ‘लुई (नववा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 25 एप्रिल 1214)
1819 : ‘जेम्स वॅट’ – स्कॉटिश संशोधक यांचे निधन. (जन्म : 19 जानेवारी 1736)
1822 : ‘विल्यम हर्षेल’ – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 15 नोव्हेंबर 1738)
1867 : ‘मायकेल फॅरेडे’ – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 22 सप्टेंबर 1791)
1908 : ‘हेन्री बेक्वेरेल’ – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म : 15 डिसेंबर 1852)
2000 : ‘कार्ल बार्क्स’ – डोनाल्ड डकचा जन्मदाता हास्यचित्रकार यांचे निधन. (जन्म : 27 मार्च 1901)
2001 : ‘डॉ. व. दि. कुलकर्णी’ – संतसाहित्याचे अभ्यासक समीक्षक यांचे निधन.
2001 : ‘केन टाइरेल’ – टायरेल रेसिंग चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 3 मे 1924)
2008 : ‘सईद अहमद शाह’ – उर्दू शायर यांचे निधन. (जन्म : 12 जानेवारी 1931)
2012 : ‘नील आर्मस्ट्राँग’ – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव यांचे निधन. (जन्म : 5 ऑगस्ट 1930)
2013 : ‘रघुनाथ पनिग्राही’ – भारतीय गायक-गीतकार यांचे निधन. (जन्म : 10 ऑगस्ट 1932)