आईसह तीन मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना अंबेजोगाई तालुक्यातील बागझरी येथे घडली आहे. रात्रीच्या जेवणामधून झालेल्या विषबाधेमुळे तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर या बालकांची आई मृत्यूशी झुंज देत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच विषबाधेचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथील काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या कुटुंबातील ३ बालकांसह पत्नी अशा चार सदस्यांना विषबाधा झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
साधना (वय 6), श्रावणी (वय 4), नारायण (8 महिने) अशी मृत बालकांची नावे आहेत. तर, पत्नी भाग्यश्री (वय 28) यांची देखील प्रकृती चिंताजनक आहे. रात्रीच्या जेवणानंतर ही विषबाधा झाली असल्याचा संशय काशीनाथ धारासुरे यांनी व्यक्त केला. परंतु, नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
[read_also content=”कर्मचाऱ्यासोबतचा वाद HR च्या अंगलट! रस्त्यात अडवून निर्माण केली दहशत, सहा जणांना अटक https://www.navarashtra.com/pune/paschim-maharashtra/pune/hr-car-vandalize-stone-pelting-after-fight-six-arrested-in-pune-245593.html”]