पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लडाखचा दौरा करुन भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविले आहे.(From Leh, Prime Minister Modi challenged China) गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात जखमी झालेल्या सैनिकांची त्यांनी रुग्णालयात जावून भेट घेतली. जखमी सैनिकांची पंतप्रधानांनी भेट घेणे ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे. या भेटीतून पंतप्रधानांनी चानला असा संदेश दिला आहे की, जर चीनने भारतावर युद्ध थोपविले तर भारत त्यासाठी सुद्धा तयार आहे. कोणत्याही परिस्थीतीत भारत चीन समोर झुकणार नाही, असे पंतप्रधानांनी या भेटीतून सुचित केले आहे. ११ हजार फूट उंचीवर असलेल्या नीमू युद्धभूमीवर पंतप्रधान मोदी सर्वप्रथम पोहचले, नीमू येथूनच चीनच्या एलएसी व पाकिस्तानला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लक्ष ठेवण्यात येते. यापूर्वी भारताने चिनी अॅप्सवर प्रतिबंध घातले आणि चीन सोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडून टाकले. यातून हे स्पष्ट होते की. भारत आता चीनच्या कोणत्याही दाबावापुढे झुकणार नाही. बिपीन रावत व लष्करप्रमुख मनोज नरवणे हे सुद्धा होते. पंतप्रधानांचे नीमू येते जाणे म्हणजे पाकिस्तानला स्पष्ट संदेश होता की, पाकने चीनचा मोहरा बणून भारताकडे वाकडी नजर करु नये. पंतप्रधानांनी चीनलाही इशारा दिला की, विस्तारवादाचे युग संपलेले आहे.(From Leh, Prime Minister Modi challenged China) गलवान खोऱ्यामध्ये आमच्या शत्रूने भारतीय जवानांचा क्रोध पाहिलेला आहे. आम्ही शांत आहोत, याचा अर्थ कोणीही आम्हाला कमजोर समजण्याची चूक करु नये. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. चिनी विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, भारत आणि चीनमध्ये तणाव कमी करण्यासाठी सैन्य आणि राजकीय स्तरावर चर्चा सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही पक्षाकडून परिस्थिती आणखी बिघडविण्याची पावलं उचलू नये. पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जवानांचे कौतुक करताना म्हटले की तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे. पर्वतासारखी ती अटळ आहे आणि तुमचे हात पर्वतासारखे मजबूत आहे. दुसरीकडे चीनचे जे ४० जवान गलवान खोऱ्यातील संघर्षात ठार झाले त्यांची नावे चीनने जाहीर केली नसल्यामुळे त्याचे कुटूंबीय चीन सरकारवर नाराज आहेत. मोदी यांनी ज्या पद्धतीने भारतीय जवानांची हिंमत वाढविली ते अत्यंत प्रेरणादायी आहे. इ.स. १९६२ च्या युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु हे सुद्धा तेजपूर येथे जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी गेले होते. इ.स. १९६५ च्या युद्धाच्या वेळी लालबहादूर शास्त्री यांनीही जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी म्हटले होते की, देशातील प्रत्येक नागरिक तुमच्यासोबत आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, आमच्या जवानांचे शौर्य संपूण जगाने पाहिले आहे. जेव्हा जेव्हा भारतावर हल्ले होतात तेव्हा भारत दुप्पट ताकदीने पुढे येत असतो.