Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haryana Crime: हरियाणा हादरलं! पाच महिन्यांचं लग्न, दोन महिन्यांची गर्भावस्था…पतीनेच घेतला पत्नीचा जीव

हिसार येथे पतीनेच दोन महिन्यांच्या गर्भवती पत्नी महकची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीचा मृतदेह माहेरी पोहोचताच कुटुंबावर शोककळा पसरली असून पोलिसांनी गुन्हा दाखल

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 18, 2026 | 11:39 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पाच महिन्यांपूर्वी लग्न; महक दोन महिन्यांची गर्भवती होती.
  • पतीवर हत्येचा आरोप; मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट.
  • पोलिस तपास सुरू; कुटुंबीय आणि परिसरात तीव्र हळहळ.
हरियाणा: हरियाणातील हिसार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या गर्भवती पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना सोमवारी (16 फेब्रुवारी) संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे या दाम्पत्याचे लग्न पाच महिन्यापूर्वीच झाले होते. आणि ती दोन महिन्यांची गर्भवती होती. मात्र या ५ महिन्यात असं काय घडलं की पतीने कश्याचीच पर्वा न करता एवढे टोकाचे पाऊल का उचलले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस होण्याचं स्वप्न अधुरंच! सरावासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

काय घडलं नेमकं?

हिसार येथील हंसी परिसरातील सेठी चौकात राहणाऱ्या कृष्ण कथुरिया यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या मुलीचे लग्न हिसार येथील सेक्टर 33 मध्ये राहणाऱ्या अंशुल धवन याच्याशी 25 सप्टेंबर 2025 झाले होते. कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार, लग्नानंतर दोघेही सुखी होते आणि त्यांच्यात कधीही वाद झाल्याचे समोर आले नव्हते. गेल्या महिन्यातच अंशुलने नवीन कारही खरेदी केली होती. रविवारी महक आणि अंशुल हिसारहून गुरुग्रामला जात असताना हंसी येथे माहेरी थांबले होते. महकला शेवया आवडत असल्याने आईने तिला पोटभर भरवले आणि जाताना सोबतही दिल्या. मात्र ही भेट शेवटची असेल हे कोणालाही वाटले नव्हते. रात्री अचानक अंशुलच्या वडिलांचा फोन आला आणि त्यांनी महकची हत्या झाल्याचे सांगितले. यामुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला.

हत्या का करण्यात आली?

महकची हत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा महकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई-वडील, मोठी बहीण श्रुती आणि भाऊ अक्षय असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महक अत्यंत शांत स्वभावाची

महक गेल्या साडेपाच वर्षांपासून एचडीएफसी बँकेत डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत होती. तिने नरवाना येथेही सेवा बजावली होती आणि सध्या तिची बदली गुरुग्राममध्ये झाली होती. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, महक दोन महिन्यांची गर्भवती होती. शेजाऱ्यांच्या मते महक अत्यंत शांत स्वभावाची होती. तिचे वडील कृष्ण कथुरिया भाजी मंडईत दुकान चालवतात, तर भाऊ अक्षय मेडिकल रिप्रजेंटेटिव्ह म्हणून काम करतो.

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर हादरलं! पोटच्या मुलाकडून आईची निर्घृण हत्या, हत्येनंतर दोन तास मृतदेहाजवळ बसला खेळत

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: हरियाणातील हिसार परिसरात ही घटना समोर आली.

  • Que: पीडित तरुणीची विशेष माहिती काय?

    Ans: महक एचडीएफसी बँकेत डेप्युटी मॅनेजर होती आणि दोन महिन्यांची गर्भवती होती.

  • Que: पुढील कारवाई काय सुरू आहे?

    Ans: पोलिसांनी गुन्हा दाखल करून हत्येचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

Web Title: Haryana crime haryana shocked five months married two months pregnant husband took wifes life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • crime
  • Haryana
  • Haryana Crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
4

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.